Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृतिक रोशन साकारणार गँगस्टरची भूमिका, खाकीत वर्दीत दिसणार सैफ अली खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 13:49 IST

हृतिक रोशन या सिनेमात हिरोची नाही तर व्हिलनची भूमिका साकारणार आहे.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हृतिक रोशनने साऊथच्या सुपरहिट चित्रपटाच्या हिंदी रिमेकला होकार दिला आहे आणि या सिनेमात हृतिक रोशन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हृतिक 'वेधा'ची भूमिका साकारणार आहेपिंकविलाच्या रिपोर्टनुसार, हृतिक रोशनने साऊथच्या सुपरहिट फिल्म 'विक्रम वेधा'साठी होकर दिला आहे. रिपोर्ट्सनुसार, हृतिक रोशन या सिनेमात हिरोची नाही तर व्हिलनची भूमिका साकारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हृतिक 'वेधा' अर्थात चित्रपटातील गँगस्टर च्या भूमिकेत दिसणार आहे.

उन्हाळ्यात सुरू होणार शूटिंग'विक्रम वेधा' पुष्कर आणि गायत्री यांच्या जोडीने दिग्दर्शित केले होते. हृतिक रोशनने सिनेमात व्हिलेनच्या भूमिकेसाठीची तयारी सुरु केली आहे. ह्रतिकने सिनेमातील लूक्स आणि बॉडी लँग्वेजवर काम करायला सुरुवात केली आहे. यावर्षी उन्हाळ्यात सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. 

सैफ अली खानशी  होणार आमना सामना एकीकडे विक्रम वेधाच्या रीमेकमध्ये हृतिक रोशन व्हिलनची भूमिका साकारणार आहे तर दुसरीकडे सैफ अली खान या सिनेमा विक्रम म्हणजेच एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. हृतिक आणि सैफला एकत्र पाहणे चाहत्यांसाठी मेजवानी ठरणार आहे.

टॅग्स :हृतिक रोशनसैफ अली खान