कबिर खानच्या आगामी चित्रपटात हृतिक रोशन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2017 21:49 IST
बॉलिवूडचा दंबग सलमान खानचा आगामी चित्रपट ‘ट्युबलाईट’मध्ये शाहरुख खानचा किमिओ असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र त्यात याची कोणती भूमिका ...
कबिर खानच्या आगामी चित्रपटात हृतिक रोशन?
बॉलिवूडचा दंबग सलमान खानचा आगामी चित्रपट ‘ट्युबलाईट’मध्ये शाहरुख खानचा किमिओ असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र त्यात याची कोणती भूमिका असेल याची उकल झाली नाही. ‘ट्युबलाईट’चा दिग्दर्शक कबिर खान याने देखील शाहरुखच्या भूमिकेवर पडदा टाकला असून ही भूमिका करण्यात शाहरुख तयार झाला आहे असे सांगून याबद्दलची माहिती देण्यास नकार दिला आहे. मात्र त्याने आगामी चित्रपट हृतिक रोशनसोबत असू शकतो असे सागितल्याने बॉलिवूडमध्ये चर्चेला उधान आले आहे. दंगलच्या सक्सेस पार्टीत बॉलिवूडमधील दिग्गज कलावंतांनी हजेरी लावली होती. यावेळी कबीर खानही उपस्थित होता. ‘ट्युबलाईट’मधील शाहरुख खानच्या भूमिकेविषयी प्रश्न विचारल्यावर कबिर खान म्हणाला, मी या भूमिकेबाबत अधिक खुलासा करू इच्छित नाही. चित्रपट प्रदर्शित होऊ द्या तुम्हाला त्याची भूमिका कळेलच, शाहरुखचा ‘ट्युबलाईट’मध्ये किमीओ आहे, यासाठी आम्हाला एका सुपरस्टारची गरज होती. या भूमिकेची विचारणा करण्यासाठी आम्ही त्याच्याकडे गेलो होतो. तो ही भूमिका करण्यास तयार झाला आहे. कबिर खान व अभिनेता हृतिक रोशन याचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. यावर कबिर म्हणाला, जोपर्यंत माझा चित्रपट रिलीज होत नाही तोपर्यंत मी आगामी प्रोजेक्टची घोषणा करीत नाही. हृतिक सोबत माझे जुणे संबध आहे. आम्ही एकमेकांशी बोलणे होत असते. मी त्याच्यासोबत काम करण्याविषयी चर्चा केली आहे. मात्र अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही. हा भविष्यातील विचार आहे. कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाईट’ हा चित्रपट १९६२ साली झालेल्या भारत-चीन युद्धावर आधारित असून यात सलमान खानसोबतच चीनी अभिनेत्री झू झू, शत्रुघ्न सिन्हा व दिवंगत ओमपुरी यांच्या भूमिका आहेत. यात सलमान खान सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २६ जुलैला ईदच्या पर्वावर रिलीज केला जाणार आहे.