बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. पत्नी सुजैन खानला घटस्फोट दिल्यानंतर हृतिक आता गर्लफ्रेंड सबा आजादसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सबा सध्या रुग्णालयात दाखल आहे. तिला सायक्लोस्पोरा कायेटानेन्सिस(Cyclospora cayetanensis)चा संसर्ग झाला आहे. ज्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या सबा उपचार घेत असून तिने सोशल मीडियावरुन हॉस्पिटलमधला एक फोटो शेअर करत चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे.
सबाने पोस्टमध्ये म्हटलं आहे की "माझ्या आयुष्यातील हे १४ दिवस सगळ्यात वाईट होते. जी नेहमी घरचं अन्न खाते, पाण्याची बाटली सोबत ठेवते अशा व्यक्तीला हा पोटाचा आजार कुठून आला? ते पण वर्षातील सगळ्यात महत्त्वाची माझी कामाची वेळ असताना...दोन आठवड्यात मी ४ किलो वजन घटवलं. मला नीट चालताही येत नाहीये. कधी काळी मी दिवसातून दोनदा ट्रेनिंग करत होते, पुल-अप्स, हेवी वेट्स उचलत होते आणि दुसऱ्याच दिवशी मी अशक्त झाले. इतकी कमकुवत की ब्रशसुद्धा उचलायची ताकद नव्हती वेट्स तर दूरची गोष्ट. त्यामुळे प्लीज तुम्ही तुमचे सलाड, भाज्या धुवून घ्या. तुमचं आयुष्य त्यावरच आधारित आहे".
सबाची हृतिक चांगली काळजी घेत आहे. "या दिवसांत माझी चिडचिड होत असताना मला हसवत ठेवलं आणि प्रत्येक विचित्र परिस्थितीतही हृतिक विनोद शोधून काढत आहे. मी फोटोत जितकी बारीक दिसतेय तितकी मी खरं तर नाहीये. बेड खूप मोठा आहे आणि फोटोचा अँगल वाइड आहे. त्यामुळे मी अशी दिसतेय", असंही तिने म्हटलं आहे. तिच्या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
Web Summary : Saba Azad, Hrithik Roshan's girlfriend, is hospitalized with Cyclospora infection. She lost weight and struggles to walk. Saba shared her health update on social media, advising caution with salads.
Web Summary : ऋतिक रोशन की गर्लफ्रेंड सबा आज़ाद साइक्लोस्पोरा संक्रमण के कारण अस्पताल में भर्ती हैं। उनका वजन घट गया और उन्हें चलने में परेशानी हो रही है। सबा ने सोशल मीडिया पर अपना स्वास्थ्य अपडेट साझा किया और सलाद के साथ सावधानी बरतने की सलाह दी।