Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृतिकसोबत झळकलेली ही अभिनेत्री गेली अभिनयक्षेत्रापासून दूर, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 16:56 IST

हृतिकच्या फिजा या चित्रपटात आपल्याला नेहा ही अभिनेत्री पाहायला मिळाली होती. ती दिसायला अतिशय सुंदर होती.

ठळक मुद्देनेहाने प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीसोबत लग्न केले असून ती अनेकवेळा त्याच्यासोबत फिल्मी पार्ट्यांमध्ये हजेरी लावते.

हृतिक रोशनचा फिजा हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात आपल्याला नेहा ही अभिनेत्री पाहायला मिळाली होती. ती दिसायला अतिशय सुंदर होती. या अभिनेत्रीच्या सौंदर्याची त्याकाळी चांगलीच चर्चा रंगली होती. तिने फिजासोबतच करीब, राहुल, होगी प्यार की जीत यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण अचानक ती चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. तिने काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न केले असून अधिकाधिक वेळ ती तिच्या कुटुंबियांना देते.

नेहाने प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीसोबत लग्न केले असून ती अनेकवेळा त्याच्यासोबत फिल्मी पार्ट्यांमध्ये हजेरी लावते. एप्रिल २००६ मध्ये नेहाने अभिनेता मनोज वाजपेयीसोबत लग्न केले. यानंतर चित्रपटांना तिने कायमचा रामराम ठोकला आणि ती संसारात रमली. नेहाचे खरे नाव शबाना रजा आहे. तिने तिचे नाव का बदलले, यामागेही कारण आहे. होय, नेहा चित्रपटसृष्टीत आली, तेव्हा तिला तिचे नाव बदलण्याची मुळीच इच्छा नव्हती. एका मुलाखतीत तिने याचा खुलासा केला होता. माझ्या आईवडिलांनी मोठ्या प्रेमाने माझे नाव शबाना ठेवले होते. पण चित्रपटात आल्यानंतर नाव बदलण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला आणि मला माझे नाव बदलावे लागले,असे तिने सांगितले होते. नाव बदलण्याची काहीही गरज नाही. पण चित्रपटांत येताच नाव का बदलावे लागते, ही गोष्ट माझ्या समजण्यापलीकडची आहे, असे तिने म्हटले होते.

लग्नापूर्वी सुमारे सात वर्षे नेहा आणि मनोज रिलेशनशिपमध्ये होते. नेहा आणि मनोजला एक मुलगी असून तिचं नाव नैला आहे. बॉलिवूडला रामराम केल्यानंतर नेहा अनेकवेळा सिनेमांच्या स्पेशल स्क्रिनिंगला पती मनोजसोबत दिसते. तसेच मनोजच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर देखील आपल्याला नेहा आणि नैला यांचे फोटो पाहायला मिळतात. 

टॅग्स :मनोज वाजपेयी