Join us

हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणचा 'फाइटर' बॉलिवूडचा सर्वात महागडा सिनेमा?, बजेट वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 13:19 IST

या सिनेमात हृतिक रोशन एअरफोर्स पायलटची भूमिका साकारणार आहे.

हृतिक रोशनच्या वाढदिवशी (१० जानेवारी) त्याच्या आगामी सिनेमा ‘फाइटर’चा टीझर रिलीज करण्यात आला.  या सिनेमाविषयी चाहते खूप उत्साही आहेत.  दीपिका पादुकोण आणि हृतिक या सिनेमात एकत्र  दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार या सिनेमाचे बजेट खूप मोठे आहे आणि त्यात काही जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स दिसतील.  बॉलिवूडमधील हा सर्वात महागडा सिनेमा असल्याचे बोललं जातंय. 

अडीचशे कोटींचा सिनेमाचा बजेट  या सिनेमात हृतिक रोशन एअरफोर्स पायलटची भूमिका साकारणार आहे.  या सिनेमाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद आहेत. त्याने 'वॉर' आणि 'बँग बँग' सारखे सिनेमे केले आहेत.  'फाइटर'  सिनेमाचे बजेट सुमारे 250 कोटी असल्याची चर्चा आहे. या सिनेमात भरपूर अ‍ॅक्शन सीन्स असल्याची माहिती आहे.

 पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये रिलीज होणार सिनेमा  या सिनेमातील दीपिका पादुकोणची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.  सिनेमात प्रेक्षकांना देशभक्तीसह रोमान्स देखील पाहायला मिळणार आहे.  'फाइटर' चे शूटिंग डिसेंबर २०२१ मध्ये सुरू होईल.  ३० सप्टेंबर २०२२ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. 

याशिवाय ह्रतिक दक्षिणच्या सुपरहिट सिनेमा ‘विक्रम वेधा’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, हृतिक रोशनशी एक-दोन महिन्यांपासून या चित्रपटाविषयी चर्चा सुरु आणि आता त्याने सिनेमात काम करण्यास तयार झाला आहे..

टॅग्स :हृतिक रोशनदीपिका पादुकोण