Join us  

​पैसे नसताना स्टार्स कसा चालवितात आपला खर्च; नेहा धुपियाने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2017 1:26 PM

बॉलिवूड स्टार्सची लाईफ ग्लॅमरस असते, नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी फॅशन व लाईफस्टाईल त्यांना मेंटेन करायची असते. मात्र अनेक वर्षे ...

बॉलिवूड स्टार्सची लाईफ ग्लॅमरस असते, नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी फॅशन व लाईफस्टाईल त्यांना मेंटेन करायची असते. मात्र अनेक वर्षे पडद्यापासून दूर असलेले स्टार्स काय करतात असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडतोच. विशेष म्हणजे काम नसताना देखील हे स्टार्स आपला स्टेटस कसा कायम राखतात, आपला खर्च कसा चालवितात या प्रश्नाचे उत्तर अभिनेत्री नेहा धुपियाने दिले आहे. अभिनेत्री नेहा धुपिया बरेच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर दिसली नाही. दरम्यान टीव्हीवर ‘नों फिल्टर नेहा’ शोच्या माध्यमातून ती नेहमीच चर्चेत राहीली आहे. नेहाच्या शोमधून अनेक बॉलिवूड स्टार्सच्या जीवनाबद्दल खुलासे तिने केले आहेत. चित्रपटात काम करीत नसल्याने या मोठ्या स्टार्सचा खर्च कसा चालतो या प्रश्नाचे उत्तर खुद्द नेहा धुपियाने दिले आहे. पीटीआयशी बोलताना नेहा म्हणाली, अनेक असे मोठे स्टार्स आहेत जे चित्रपटात दिसत नाहीत. मात्र त्यांच्याजवळ फुटबॉल टीम असते, त्यांचे दुसरे व्यवसाय असतात. एवढेच नव्हे तर ज्या अभिनेषी सात-आठ वर्षांपासून चित्रपटात कामच करीत नसतात त्यांच्याकडे एडोर्समेंट असतात. त्या टीव्हीवर काम करतात. म्हणजेच त्या कोणते तरी काम करीतच असतात. दुसरीकडे नेहाने आपल्या चित्रपट करिअरविषयी माहिती दिली. नेहा म्हणाली, मला चित्रपटांचे आॅफर्स येत आहेत मात्र ते फार चांगले नाहीत. त्यात मजा नाही. जेव्हा माझ्याकडे चांगली कथा येईल तेव्हाच मी त्यात काम क रेल. उदाहरणार्थ दंगल, तो अप्रतीम चित्रपट होता. मात्र मी त्यात फिट बसले नसते. मागील वर्षी रिलीज झालेला नेहा धुपियाचा ‘मोह माया मनी’ हा नेहाचा अखेरचा चित्रपट होता. यानंतर ती आतापर्यंत कोणत्याच चित्रपटा दिसली नाही किंवा दिसेल अशीही चर्चा नाही. नेहा धुपियाने केलेला खुलासा खुद्द तिच्यावर लागू होतो असे म्हणायला हरकत नाही. असे अनेक स्टार्स आहेत. जे चित्रपटात दिसत नसले तरी देखील चर्चेत स्थान मिळविण्यासाठी आपली लाईफस्टाईल मेंटन करीत असतात.