Join us

एकीकडे जग न्यु इअर सेलिब्रेशन करत होते, तर दुसरीकडे 'या' अभिनेत्रीने अशारितीन घातला होता धुमाकुळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 09:57 IST

मौनी एक ट्रेंड कथ्थक डान्सर आहे. सुरूवात २००६ साली एकता कपूरची मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधून करिअरची सुरुवात करणा-या मौनीने 'गोल्ड' या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता.

सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी आपल्या फॅन्ससह संवाद साधतात. त्यांच्यासह आगामी सिनेमा, ट्रेलर, भूमिका याविषयी गप्पा मारतात. या माध्यमातून रसिकांच्या प्रतिक्रिया थेट जाणून घेता येत असल्याने सेलिब्रिटी सोशल मीडियाला प्राधान्य देत आहेत. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अभिनेत्री मौनी रॉय. नुकतेच तिने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. 

समुद्र किनाऱ्यावर धम्माल करत असतानाचा फोटो फॅन्सच्या पसंतीस पात्र ठरत आहे. न्यु इअर सेलिब्रेशन या अभिनेत्रींने तिने समुद्र किनारी सेलिब्रेट केल्याचे पाहायला मिळतंय. या फोटोंवरून मौनी सध्या आपल्या मोकळ्या वेळेचा उपयोग जीवनात शांतता, समाधान मिळवण्यासाठी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

विशेष म्हणजे मौनीचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअर्स आहेत. काही तासांतच या फोटोला लाखांहून अधिक लाईक्स मिळाले होते. बिकीनीतील तिचा हा अंदाज सा-यांच्या पसंतीस पात्र ठरला. हा फोटो पाहताच घायाळ नाही झाला तरच नवल.

मौनी एक ट्रेंड कथ्थक डान्सर आहे. सुरूवात २००६ साली एकता कपूरची मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मधून करिअरची सुरुवात करणा-या मौनीने 'गोल्ड' या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू केला होता. तिचा 'मेड इन चायना' हा सिनेमा रिलीज झाला. लवकरच ती रणबीर व आलियाच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये झळकणार आहे.

टॅग्स :मौनी राॅय