बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी आयटम गर्ल राखी सावंत नेहमीच तिच्या बोल बच्चनमुळे चर्चेत असते. कधी वादग्रस्त वक्तव्य, तर कधी सेक्सी अदा दाखवून ती लाइमलाइटमध्ये असते. यावेळेस तिने असाच काहीसा कारनामा केला आहे. अतिशय हॉट अॅण्ड सेक्सी ड्रेस परिधान करून डान्स करतानाचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
होय, सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह राहणाºया राखीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ती जबरदस्त हॉट दिसत आहे. त्यातच तिच्या डान्स करतानाच्या अदा घायाळ करणाºया आहेत. व्हिडीओमध्ये राखीने सिल्व्हर रंगाचा ड्रेस परिधान केलेला आहे. अर्थातच हा ड्रेस तिच्या शरीरावर आखूड दिसत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच केवळ तिचे नग्न पाय दिसत असल्याने व्हिडीओ बघण्यासाठी नेटिझन्सची तुफान गर्दी होत आहे. पायावरून हळहळू तिच्या चेहºयावर जाणारा कॅमेरा राखीची अदा बघण्यासाठी आतुरता निर्माण करतो. त्यानंतर राखी ज्या पद्धतीने डान्स करताना हावभाव करते त्यावरून तिच्या फॅन्समध्ये आग लागली नसेल तरच नवल.
राखी सावंतने बॉलिवूडमध्ये आयटम गर्ल म्हणून एण्ट्री केली होती. त्यामुळे ती जबरदस्त डान्सर असून, तिच्या सेक्सी अदांवर फॅन्स नेहमीच भावून गेले आहेत. आता ती पुन्हा एकदा असाच काहीसा कारनामा करण्यास तयार असून, या व्हिडीओमधून तिने जणू काही याबाबतचे संकेतच दिले आहेत. असे म्हटले जात आहे की, हा व्हिडीओ तिच्या आगामी सिनेमाच्या गाण्यातील शूटिंगचाच एक भाग आहे. वास्तविक हा सिनेमाशी संबंधित कुठलीच माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर सध्या यावरून जोरदार चर्चा रंगत आहे.
https://www.instagram.com/p/BQQf3OvgHHB/