Hotness Overloaded : मलायका अरोराचे बिकिनीतील फोटोशूट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 11:23 IST
‘बॉलिवूडची मुन्नी’ म्हणजेच मलायका अरोरा खान ही ‘बी टाऊन’च्या सर्वांत हॉट अॅण्ड ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. पती अरबाज खानसोबत ...
Hotness Overloaded : मलायका अरोराचे बिकिनीतील फोटोशूट!
‘बॉलिवूडची मुन्नी’ म्हणजेच मलायका अरोरा खान ही ‘बी टाऊन’च्या सर्वांत हॉट अॅण्ड ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. पती अरबाज खानसोबत घटस्फोट मिळवल्यानंतर ती पुन्हा तिचे बॅचलर लाईफ एन्जॉय करतांना अलीकडेच अनेकदा दिसतेय. गर्लगँगसोबत आऊटींग, गर्ल्स नाईट आऊट, पार्टीज, व्हॅकेशन्सवर जातांना दिसतेय. अलीकडेच ती पुन्हा एकदा तिच्या स्टनिंग अवतारात दिसली. तिने खास तिच्या चाहत्यांसाठी हे फोटोशूट केल्याचे कळतेय. तिने काव्यात्मक रूपात या फोटोचे कॅप्शन देत ती म्हणते,‘ पाण्याच्या मधोमध...’ ALSO READ : SEE : गोव्यात मलायक अरोराचा हॉट बिकिनी जलवा! ‘बॉलिवूड डिवा’ मलायका अरोरा (खान?) ही नेहमीच विवाहित सर्व महिलांची रोल मॉडेल ठरलेली आहे. तिची हॉट फिगर तिच्या चाहत्यांना नेहमीच भुरळ घालते. रेग्युलर वर्कआऊट आणि स्ट्रिक्ट डाएट हे तिच्या फिटनेसचे वैशिष्ट्य असल्याचे तिने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले होते. पती अरबाज खान यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर तिने तिच्या दोन्ही मुलांची जबाबदारी पतीवर देऊन टाकली. त्या दोघांचा घटस्फोट होण्याअगोदर त्यांनी अनेक समुपदेशन सेशन्सला हजेरी लावली आहे. मात्र, त्यानंतर झालेल्या त्यांच्या घटस्फोटावरून तर या सेशन्सचा काही उपयोग झाला नसल्याचे जाणवते. ALSO READ : न्यूर्याकमध्ये मलायकाचा बिनधास्त अंदाज