Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॉट पूनम पांडेने बॉयफ्रेंडसोबत गुपचुप उरकला साखरपुडा; शेअर केला फोटो!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 19:21 IST

ती तिचे हॉट व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता मात्र, तिने एक असा फोटो पोस्ट केलाय जो बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. होय, तो फोटो आहे तिच्या साखरपुड्याचा.

बॉलिवूडच्या अत्यंत हॉट अभिनेत्रींपैकी एक म्हणून पूनम पांडेला आपण ओळखतो. तिच्या हॉट अंदाजातील अदा पाहून चाहते अक्षरश: घायाळ होतात. ती सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती तिचे हॉट व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता मात्र, तिने एक असा फोटो पोस्ट केलाय जो बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. होय, तो फोटो आहे तिच्या साखरपुड्याचा. तिने नुकताच तिचा बॉयफ्रेंड सॅम बॉम्बे याच्यासोबत गुपचुप साखरपुडा करून घेतलाय. तिने फोटो पोस्ट करून सॅमसोबतचे नाते चाहत्यांसमोर मान्य केले आहे. तुम्ही उत्सुक असालच तो फोटो बघायला.. तर मग बघा...

पूनम पांडेचा बॉयफ्रेंड सॅमने दोन दिवसांपूर्वी त्यांच्या साखरपुड्याचा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करून चाहत्यांसोबत ही गुड न्यूज शेअर केली होती. त्याने या फोटोला कॅप्शन दिले होते की,‘अखेर आम्ही हे केले..’ त्यावर पूनमने प्रतिक्रिया देत म्हटले,‘खुप चांगली भावना.’ त्यांनी या पोस्टनंतर दुसरी कुठली हिंट दिलेली नाहीये. त्यामुळे चाहत्यांनी त्यांच्या एंगेजमेट झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देत आहेत. 

सॅम आणि पूनम यांना लॉकडाऊनमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी चार्ज केले होते. त्यांच्यावर असा आरोप होता की, ते दोघे लॉकडाऊनमध्ये लाँग डाईव्ह करायला निघाले होते. मात्र, ही बाब पूनमने स्विकारली नव्हती. तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत ती घरीच चित्रपट बघत वेळ घालवत असल्याचे तिने सांगितले होते. 

टॅग्स :पूनम पांडेबॉलिवूड