हॉट मॉडेल सोफिया बनली नन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2016 16:28 IST
‘बिग बॉस’च्या सातव्या सीझनमधील ब्रिटीश मॉडल सोफिया हयात आठवतेयं?? एकेकाळी सोफियाचे न्यूड फोटो शूट चांगलेच चर्चेत आले होते. आता ...
हॉट मॉडेल सोफिया बनली नन
‘बिग बॉस’च्या सातव्या सीझनमधील ब्रिटीश मॉडल सोफिया हयात आठवतेयं?? एकेकाळी सोफियाचे न्यूड फोटो शूट चांगलेच चर्चेत आले होते. आता सोफिया पुन्हा एकदा चर्चेत आहे. मात्र यावेळची बातमी शॉकिंग आहे. सोफियाने ग्लॅमरचे जग सोडून अध्यात्माची वाट धरली आहे. होय.. ती नन बनली आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिने स्वत:ची काही छायाचित्रे पोस्ट केली. आता ती आपल्या नावासमोर ‘मॉडेल’ ऐवजी ‘मदर’ लावणे अधिक पसंत करते.ग्रीक माइथॉलॉजी फॉलो करीत सोफियाने अध्यात्माची कास धरली आहे. आपल्या शरिरावर अनेक ठिकाणी तिने धार्मिक टॅटू बनवले आहेत. अर्थात तिच्या आयुष्यातील या स्थित्यंतरामागचे कारण तिने सांगितलेले नाही.