Join us
Daily Top 2Weekly Top 5

हॉलिवूडचे स्टंटमॅन बॉलिवूडमध्ये पॉप्युलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2016 21:39 IST

हॉलिवूडच्या बरोबरीचे सिनेमे बॉलिवूडमध्येही बनत असल्याने या सिनेमांमधील खतरनाक अ‍ॅक्शन प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहे. मात्र अशाप्रकारचे अ‍ॅक्शन सिन्स ...

हॉलिवूडच्या बरोबरीचे सिनेमे बॉलिवूडमध्येही बनत असल्याने या सिनेमांमधील खतरनाक अ‍ॅक्शन प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहे. मात्र अशाप्रकारचे अ‍ॅक्शन सिन्स करताना त्यात जोखीमही तेवढीच असल्याने निर्माते थेट हॉलिवूडमधील काही स्टंटमॅनकडून असे सिन्स शूट करीत आहेत. सध्या असेच काही स्टंटमॅन बॉलिवूडमध्ये पॉप्युलर होत असून, त्यांचा घेतलेला हा आढावा...ग्रेग पावेलब्रिटिश स्टंटमॅन ग्रेग पावेल यांनी ‘एवेंजर्स’ आणि ‘स्कायफॉल’सारख्या अ‍ॅक्शनपटांमध्ये स्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. त्यांनी प्रेम ‘रतन धन पायो’ या सिनेमात सलमानला ट्रेनिंग दिली आहे. तसेच चित्रपटातील काही स्टंटही डायरेक्ट केले आहेत. त्यांनी साउथच्या अनेक चित्रपटांमध्ये स्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. तसेच ‘हॉलिडे’मध्ये त्यांनी अक्षयकुमार यास ट्रेन केले होते. सिरिल राफेलीहॉलिवूडमध्ये स्टंटसाठी नावाजल्या गेलेल्या आणि स्टंट कॅटेगिरीत अनेक पुरस्कार पटकावलेल्या ‘द इनक्रेडिबल हल्क’, ‘द ट्रांसपोर्टर’ आणि ‘हिटमॅन’ यासारख्या सिनेमांमध्ये स्टंट डायरेक्टर म्हणून काम करणारे सिरिल राफेली सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेत आहेत. सध्या राफेली ‘नाम शबाना’ या सिनेमात प्रमुख भूमिकेत असलेल्या तापसी पन्नू हिला ट्रेन करीत आहेत. त्यांनी अक्षयच्या सुपरहिट ‘बेबी’ या चित्रपटात स्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. रॉबर्ट मिलर‘जॉन मिलर मस्ट डाय’ आणि ‘लायसेंस टू वेड’ यासारख्या हॉलिवूडपटांमध्ये अ‍ॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केलेले रॉबर्ट मिलर बॉलिवूडमध्ये चांगलेच पॉप्युलर ठरत आहेत. त्यांनी ‘अजहर’ या सिनेमात स्पोटर््स सीनला अ‍ॅक्शनचा तडका दिला होता. सैफ अली खान आणि करिनाच्या ‘कुर्बान‘ या चित्रपटातही त्यांनी स्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. स्पिरो रॅजेटॉसहवेत गाड्या उडविण्यासाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक रोहित शेट्टी अ‍ॅक्शनसाठी ओळखले जातात. आता अशीच ओळख स्पिरो रॅजेटॉस यांनी निर्माण केली आहे. कारण स्पिरोदेखील हवेत गाड्या उडविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘फास्ट फाइव्ह’, ‘बॅड बॉयज-२’, ‘डेथ रेस’ यांसारख्या हॉलिवूडपटांमधून अ‍ॅक्शनचा थरार दाखविला. त्यांनी साजिद नाडियाडवाला यांच्या ‘किक’ आणि संजय गुप्ता यांच्या ‘जज्बा’ या सिनेमांमध्ये काम केले आहे.