Join us  

Holi Special : बॉलिवूडचे हे पाच कपल साजरी करताहेत लग्नानंतरची पहिली होळी !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 6:00 AM

यंदाची होळी तर बॉलिवूडसाठी खास असणार आहे. गतवर्षी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. त्यामुळे या सेलिब्रिटींची लग्नानंतरची ही पहिली होळी आहे.

ठळक मुद्दे लग्नानंतर प्रियंका व निक पहिल्यांदा एकत्र होळी साजरी करतील. निकची तर ही आयुष्यातील पहिली होळी असणार आहे.

होळी म्हणजे उत्साहाचा, रंगांची उधळण करणारा सण. वैर विसरून प्रेमाच्या रंगात रंगून जाण्याचा हा दिवस. बॉलिवूडही त्याला अपवाद नाही. यंदाची होळी तर बॉलिवूडसाठी खास असणार आहे. गतवर्षी बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. त्यामुळे या सेलिब्रिटींची लग्नानंतरची ही पहिली होळी आहे.

दीपिका पादुकोणरणवीर सिंग

बॉलिवूडचे ‘बाजीराव मस्तानी’ दीपिका पादुकोणरणवीर सिंग गतवर्षी नोव्हेंबरमध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांचे लग्न गतवर्षीचे सर्वात हायप्रोफाईल लग्न ठरले. दीपिका व रणवीर यंदा लग्नानंतरही पहिली होळी साजरी करत आहेत. ‘गोलियों की रासलीला- रामलीला’ या चित्रपटाच्या सेटवर दीपिका व रणवीर यांच्यात प्रेम फुलले होते. विशेष म्हणजे या चित्रपटातही दीपिका व रणवीर एकमेकांसोबत होळीचे रंग उधळताना दिसले होते.

सोनम कपूर- आनंद अहुजा

सोनम कपूर व आनंद अहुजा यांनी गतवर्षी मे महिन्यांत लग्न केले. लग्नानंतरची त्यांची ही पहिली होळी आहे.

प्रियंका चोप्रा- निक जोनास

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा हिने गतवर्षी डिसेंबरमध्ये लग्नगाठ बांधली. अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत तिने सहजीवनाच्या आणाभाका घेतल्या. लग्नानंतर प्रियंका व निक पहिल्यांदा एकत्र होळी साजरी करतील. निकची तर ही आयुष्यातील पहिली होळी असणार आहे.

नेहा धूपिया- अंगद बेदी

२०१८ मध्ये अगदी गुपचूप लग्न करणारे नेहा धूपिया व अंगद बेदी यांचीही यंदाची लग्नानंतरची पहिली होळी आहे. या सेलिब्रेशनमध्ये नेहा व अंगदची मुलगी मेहर ही सुद्धा सामील होणार आहे. लग्नाआधीच नेहा प्रेग्नंट होती. पण तिने ही गोष्ट जगापासून लपवून ठेवली होती.

कपिल शर्मा व गिन्नी

कॉमेडी जगतातील टॉपमोस्ट कॉमेडियन कपिल शर्मा याने गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर हे कपल पहिल्यांदा एकत्र होळी साजरी करणार आहे.

टॅग्स :होळी 2023दीपिका पादुकोणरणवीर सिंगसोनम कपूरप्रियंका चोप्रा