Join us

हिमेशसोबत युलियाने रेकॉर्ड केले गाणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2016 17:34 IST

भाईची गर्लफ्रेंड आहे मग शांत कशी बसणार? शीर्षक वाचून असेच वाटले असेल ना तुम्हाला? युलिया वेंटर मुंबईत परतल्याचे अलीकडेच ...

भाईची गर्लफ्रेंड आहे मग शांत कशी बसणार? शीर्षक वाचून असेच वाटले असेल ना तुम्हाला? युलिया वेंटर मुंबईत परतल्याचे अलीकडेच तिने केलेल्या पोस्टमधून सर्वांना कळाले. तिने नुकतेच गायक हिमेश रेशमियासोबत एक गाणे रेकॉर्ड केल्याचे कळते आहे. संगीत दिग्दर्शक हिमेश रेशमिया याच्या आगामी अल्बममधील एका गाण्यासाठी युलियाने आवाज दिला आहे.‘एव्हरी डे अ‍ॅण्ड नाईट’ हे गाणे ती गाणार असून याची केवळ एकच ओळ इंग्रजीतून असून संपूर्ण गाणे हिंदी भाषेतून आहे. आता प्रश्न हा आहे की, युलिया हिंदीतूनही बोलू, गाऊ लागली का? भाईजान सलमानने तर शिकवले नाही ना तिला? ‘सुल्तान’ मधील ‘जग घुमेया’ हे युलियाने गायलेले गाणे हिमेशने ऐकले आणि तो तिच्या आवाजाच्या प्रेमातच पडला. त्याने लगेचच तिला गाणं गाण्याची संधी दिली. हे रोमँटिक गाणं लवकरच शूटही होणार असल्याचे कळतेय.