Join us
Daily Top 2Weekly Top 5

काय होतीस तू काय झालीस तू, एकेकाळी अभिनेत्रीचा असायचा बोलबाला, आता अशी झाली तिची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 19:37 IST

समीरा लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर झाली आणि संसारात रमली. समीरा दोन मुलांची आई बनली आहे. एरव्ही मेकअपमध्ये दिसणारी समीरा आता विनामेकअपच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

समीरा रेड्डीचा एका फोटो समोर आला आहे. समीराने  या फोटोत जराही मेकअप केलेला नाही. तसेच विनामेकअप लूक असला तरी तिच्या चेह-यावर कमालीचा आत्मविश्वास पाहायला मिळतोय. समीरा लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर झाली आणि संसारात रमली. समीरा दोन मुलांची आई बनली आहे. एरव्ही मेकअपमध्ये दिसणारी समीरा आता विनामेकअपच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करते. 

तिचा हा फोटो पाहून काहींनी तिला ओळखलेही नाही. मात्र ज्यांनी ज्यांनी समीराला या फोटोत ओळखले. त्यांनी तिचे कौतुकच केले आहे. विशेष म्हणजे ऑनस्क्रीन लूक प्रमाणेच स्वराचा हा ऑफस्क्रीन लूकही तिच्या चाहत्यांच्या पसंती उतरला आहे. पूर्वीप्रमाणे समीराचे आयुष्य राहिले नसून आता मुलांचा सांभाळ करण्यात आणि घर सांभाळण्यातच तिचा वेळ जातो. त्यामुळे स्वतःकडे फारसे लक्ष देणेही तिला जमत नसल्याचे तुम्हालाही जाणवेल. 

दरम्यान समीरानेही सध्या बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या घराणेशाहीवर आपले मत मांडले आहे.या विषयावर आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी घराणेशाहीवर आपले मत व्यक्त करत त्यांचेही अनुभव शेअर केले आहेत.  समीरा रेड्डीनेही बॉलिवूडमध्ये करिअरच्या सुरूवातीपासून तिलाही कसा घराणेशाहीमुळे फटका बसला याविषयी सांगितले. तिला अचानक साईन केलेल्या तीन सिनेमांतून काढण्यात आले होते.एका सिनेमात तिच्या जागी स्टारकिडला घेण्याचे ठरल्यानंतर तिच्याकडून हा सिनेमा काढण्यात आला होता. बाकी सिनेमात सिनेमाच्या हिरोची ज्याच्यासह चांगली मैत्री होती त्यानुसार कास्टिंग केले गेले. 

अचानक सिनेमातून काढण्यात आल्याचे ऐकून मला खूप वाईट वाटलं आणि मी माझ्यावरच शंका घ्यायला लागले.मी आईला सांगितले की कदाचित ते बरोबर आहेत, मी त्या भूमिकेसाठी योग्य तयारी केली नाही.पण नंतर माझ्या एका मित्राकडून मला सांगण्यात आले की माझी जागा स्टार किडने घेतली आहे, परंतु निर्मात्याने मला सांगण्याची हिम्मत केली नाही.

समीरा म्हणाली की, ती बॉलिवूडच्या ब्युटी स्टॅंडर्डनुसार ठीक नव्हती आणि सतत तिला लूक्सवरून टोमणे मारले जात होते. समीरा म्हणाली की, बॉलिवूडमध्ये लोक तिला सावळ्या रंगासाठी आणि उंचीसाठी टोमणे मारले जायचे.

टॅग्स :समीरा रेड्डी