Join us  

लग्नाची गोष्ट कित्येक वर्ष लपवून ठेवली होती या अभिनेत्री, एका गोष्टीमुळे फुटले बिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 4:45 PM

लग्नाचे फोटो समोर आले तेव्हा तिच्यावर प्रचंड टीका झाली. जय मेहता आणि जुही यांची जोडी पाहून अनेकांच्या खिल्ली उडवणा-या प्रतिक्रीया उमटायच्या.

बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींचे करिअर अभिनेत्यांप्रमाणे फार काळासाठी नसते. त्यातही लग्नानंतर अभिनेत्रींचं करिअर संपतं. बॉलीवुडमधील अनेक अभिनेत्रीचं करिअर लग्नानंतर संपलं. लग्न झालेल्या अभिनेत्रींना काम मिळत नाही अशी एक समज असतानाही अभिनेत्री जुही चावलाने करिअरच्या यशाच्या शिखरावर असतानाच लग्न करण्याचा निर्णय घेतला. बिझनेसमन जय मेहता यांच्यासह लग्न करुन संसारही थाटला. त्याकाळी सोशल मीडियाचा फारसा गाजावाजाही नव्हता. त्यामुळे लग्नाची बातमी जगासमोर तिने येऊ दिली नाही. जवळपास ६ वर्ष लग्नाची बातमी लपवून ठेवणे तिला त्या काळात शक्य झाले.

 मात्र लग्नाच्या काही वर्षानंतर अभिनेत्री जुही चावला गरोदर राहिली. तेव्हा कुठे तिच्या लग्नाची बातमी सगळ्यांसमोर आली होती. जुहीच्या लग्नाची बातमी ही चाहत्यांसाठी मोठा धक्काच होता. कारण यापूर्वी कोणालाही तिच्या प्रेमप्रकरणाबाबत माहिती नव्हती तसंच कोणीही तिच्या लग्नाबद्दल काहीही ऐकले नव्हते. गरोदर असल्यामुळे लग्न झाल्याची कबुली जुहीने दिली होती. करिअरची चिंता होती म्हणून लग्न झाल्याचे लपवून ठेवल्याचे तिने स्पष्ट केले होते.  

जुही चावलाचे लग्नाचे फोटो समोर आले तेव्हा तिच्यावर प्रचंड टीका झाली. जय मेहता आणि जुही यांची जोडी पाहून अनेकांना खिल्ली उडवणा-या प्रतिक्रीया दिल्या. म्हाता-या सोबत लग्न केल्याचे म्हणत लोक तिच्यावर टोमणे मारायचे. जुहीसह लग्न झाले तेव्हा जय मेहता केवळ ३३ वर्षांचे होते. जय मेहता यांचे जुही सोबतचे दुसरे लग्न आहे.

मात्र या लग्नामुळे जुहीने पैशांसाठी लग्न केल्याचेही म्हटले गेले. जुहीने देखील लोकांच्या बोलण्याचा फार जास्त विचार केला नाही. लोकांच्या टीकांवर दुर्लक्ष केले आणि वैवाहिक आयुष्यात रमली. या कपलला दोन मुलं आहेत. जान्हवी आणि मुलगा अर्जुन असे तिच्या मुलांची नावं आहेत.

जान्हवीला फारसे लाइमलाइटमध्ये राहायला आवडत नाही.जुहीने तिच्या दोन्ही मुलांना लाइमलाइटपासून दुर ठेवले आहे. जान्हवी आणि अर्जुन कधीही कोणत्याच बॉलिवूड पार्टी किंवा इव्हेंटमध्ये दिसत नाहीत. जुहीची दोन्ही मुलं शिक्षणासाठी लंडनमध्ये राहतात.  

टॅग्स :जुही चावला