Join us
Daily Top 2Weekly Top 5

सनी आणि बॉबी हेमा मालिनींना नेमकं कोणत्या नावानं हाक मारतात? 'ड्रीम गर्ल'नं स्वतः केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:52 IST

सनी आणि बॉबी देओल हेमा मालिनींना नेमकं कोणत्या नावानं हाक मारतात, याचा खुलासा 'ड्रीम गर्ल' यांनी स्वतः एका मुलाखतीमध्ये केला होता.

बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांच्या वैयक्तिक आयुष्याने नेहमीच चर्चेत राहिले आहे. हेमा मालिनी यांच्याशी लग्न करण्यापूर्वी, धर्मेंद्र यांचे लग्न प्रकाश कौर यांच्याशी झाले होते. १९८० मध्ये जेव्हा धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींशी विवाह केला, तेव्हा त्यांच्या कुटुंबात मोठी भावनिक दरी निर्माण झाली होती. धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर आणि मुलं सनी देओल आणि बॉबी देओल या निर्णयामुळे खूप दुखावले गेले होते. कालांतराने, या कुटुंबातील संबंध हळूहळू सुधारले. सनी आणि बॉबी देओल हेमा मालिनींना नेमकं कोणत्या नावानं संबोधतात, याबद्दल चाहत्यांमध्ये नेहमीच कुतूहल होतं.

वयाने फक्त नऊ वर्षांनी लहान असलेले सनी देओल आणि बॉबी देओल हे हेमा मालिनी यांना नेमके कोणत्या नावाने हाक मारतात, या प्रश्नाचे उत्तर खुद्द हेमा मालिनी यांनीच एका मुलाखतीत दिले होते.  चाहत्यांच्या प्रश्नावर उत्तर देताना हेमा म्हणाल्या होत्या, "ते दोघेही मला 'हेमा जी' म्हणून हाक मारतात".

धर्मेंद्र यांची तब्येत कशी?धर्मेंद्र यांची प्रकृती सध्या नाजूक आहे. तब्बल बारा दिवस उपचार घेतल्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या धर्मेंद्र यांच्यावर त्यांच्या मुंबईतील घरीच उपचार सुरू आहेत.  धर्मेंद्र यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीक समदानी यांनी सांगितलं की, "धर्मेंद्रजींना बुधवारी सकाळी ७:३० वाजता डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्यावर पुढील उपचार घरीच सुरू राहतील". डॉक्टरांनी सांगितलं की, धर्मेंद्र यांच्यावर पुढचे उपचार घरी करण्याचा निर्णय देओल कुटुंबीयांनी घेतला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Sunny, Bobby Deol's surprising name for Hema Malini revealed!

Web Summary : Sunny and Bobby Deol address Hema Malini as 'Hema Ji'. The revelation came directly from Hema Malini herself in an interview. Dharmendra's health is fragile, recovering at home after hospital treatment, confirmed by Dr. Pratik Samdani.
टॅग्स :हेमा मालिनीबॉबी देओलबॉलिवूडसेलिब्रिटी