Join us  

एकेकाळी हेमा मालिनीला मिळत नव्हतं काम; 'ही' गोष्ट होती कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 2:35 PM

Hema malini: हेमा मालिनी यांनी त्यांच्या करिअरमध्ये १०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. परंतु, सुरुवातीला त्यांना अनेक नकार पचवावे लागले.

 80 चं दशक गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हेमा मालिनी (hema malini). आज हेमा मालिनी त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी, त्यांच्या करिअरविषयी अनेक गोष्टींची सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे. हेमा मालिनी यांनी आजवरच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमा दिले. मात्र, एक काळ असा होता ज्यावेळी त्यांना काम मिळणं कठीण झालं होतं.

हेमा मालिनी यांनी त्यांच्या करिअरमध्ये १०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात त्यांचे असंख्य सिनेमा सुपरहिट झाले. परंतु, सुरुवातीच्या काळात त्यांच्या एका गोष्टीमुळे त्यांना अनेक नकार पचवावे लागले. त्याच्या हातून अनेक सिनेमा गेले.

या कारणामुळे हेमा मालिनी यांना केलं रिजेक्ट

इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी हेमा मालिनी प्रचंड बारीक होत्या. त्यामुळे त्या कोणत्याही ऑडिशनसाठी गेल्यावर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जायचा.  कसंबसं करुन हेमा मालिनी यांना एक तामिळ सिनेमा मिळाला. या सिनेमासाठी दिग्दर्शकांनी त्यांचं नावही बदललं आणि सुजाता असं ठेवलं. परंतु, या सिनेमाचं ४ दिवस शुटिंग झाल्यानंतर पुन्हा हेमा मालिनी यांना सिनेमातून काढून टाकलं. हेमा मालिनी यांना वारंवार रिजेक्शन मिळत होतं. परंतु, तरीदेखील त्यांनी हार मानली नाही. त्यांनी स्वत: मध्ये काही बदल केले.आ

पल्या लूक्समध्ये बदल घडवत त्यांनी क्लासिकल डान्स शिकण्यासही सुरुवात केली. त्यानंतर स्वत: मध्ये बदल केल्यानंतर त्यांनी इंडस्ट्रीमध्ये धमाकेदार एन्ट्री घेतली आणि त्यांच्याकडे सिनेमांच्या रांगा लागल्या. सुरुवातीला लहानमोठ्या भूमिका केल्यानंतर त्यांना राज कपूर यांचा सपनों के सौदागर हा सिनेमा मिळाला. या सिनेमानंतर त्यांचं नशीब पालटलं. 

टॅग्स :हेमा मालिनीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा