क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री हेजल कीच या पतीपत्नीने अलीकडे ईशा अंबानीच्या लग्नाला हजेरी लावली. पण या लग्नात हेजल पूर्णवेळ आपले पोट लपवतांना दिसली. याशिवाय अनेकजण कपलला शुभेच्छा देतानाही दिसले. साहजिकचं यावरून लोकांनी लावायचा तो अंदाज लावला. विशेष म्हणजे, हा अंदाज खराही ठरला. होय, युवराज सिंग व हेजल कीच या दोघांच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. म्हणजेच हेजल प्रेग्नंट आहे.
दोन वर्षांपूर्वी युवराज व हेजल लग्नबंधनात अडकले होते. २ वर्षांनंतर हे जोडपे आपल्या पहिल्या अपत्याला जन्म देणार आहेत. अर्थात अद्याप युवराज व कीच यांनी ही गुडन्यूज जगजाहिर केलेली नाही. पण लवकरच ही याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. आता ही घोषणा कधी होते, तोपर्यंत प्रतीक्षा करूयात.
३० नोव्हेंबर २०१६ रोजी युवी व हेजल यांचे लग्न झाले होते. गोव्यात एका पार्टीत दोघांचीही पहिली भेट झाली होती. लग्नाआधी युवराज व हेजल किच यांच्या प्रेमसंबंधाची चर्चा चांगलीच रंगली होती. यादरम्यान अचानक हरभजन सिंगच्या विवाहसोहळ्याला या दोघांनी जोडीने हजेरी लावली होती. यानंतर दोघांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली होती.
ब्रिटीश अभिनेत्री असलेल्या हेजलने सलमान -करीनाच्या बॉडीगार्ड चित्रपटात महत्वाटची भूमिका केली होती. तसेच बिग बॉस-७, झलक दिखला जा आणि कॉमेडी सर्कस अशा अनेक लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती.