Join us
Daily Top 2Weekly Top 5

​तुम्ही पाहिलीत का युवीची शेवटची ‘बॅचरल सेल्फी’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2016 16:47 IST

yuvraj singh hazel keechs wedding celebrations : क्रिकेटपटू युवराज सिंहची लग्नाआधीची शेवटची ‘बॅचरल सेल्फी’

क्रिकेटपटू युवराज सिंह लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाला आहे. मॉडेल व अभिनेत्री हेजल कीच हिच्यासोबत साता जन्माच्या गाठी बांधण्यास युवराज सज्ज झाला आहे. नवरदेव बनलेला हा ‘पंजाबी मुंडा’ हेजलसोबत लग्नगाठ बांधण्यासाठी चंदीगडपासून सुमारे ४० किमी दूर दफेडा साहिब गुरुद्वारात पोहोचला आहे. पण इथेच एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. लग्नाच्या या धामधुमीतही युवी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह दिसतो आहे. अगदी आत्ता आत्ता युवीने सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केलाय. यात युवी नवरदेव झालेला दिसतो आहे. शेरवानी आणि मरून रंगाची पगडी आणि डोक्यावर ‘सेहरा’ अशा थाटात युवी यात दिसतो आहे. लग्नाच्या अगदी काही तासांपासून काढलेली युवीची ही ‘बॅचलर सेल्फी’ चांगलीच व्हायरल झाला आहे. ही युवराची लग्नाआधीची शेवटची ‘बॅचरल सेल्फी’ असल्याने त्यास विशेष महत्त्व आहे. कदाचित त्याचमुळे युवीने ती चाहत्यांशी शेअर केली असावी. दफेडा साहिब गुरुद्वारात पारंपरिक पद्धतीने लंगर होईल. पाहुण्यांना खाली बसूनच मेजवानी दिली जाईल. आज सकाळी युवराजला हळद लागली. यावेळी त्याचे काही अतिशय जवळचे मित्र उपस्थित होते. त्यापूर्वी मंगळवारी संगीत सेरेमनी झली. युवीच्या संगीत सेरेमनीमध्ये विराट कोहलीने धम्माल डान्स केला. भारतीय क्रिकेट टीमने या सेरेमनीसाठी एक खास डान्स बसवला होता. विराट या डान्समध्येही सगळ्यांत समोर होता. सिंगर रंजीत बावा याच्या गाण्यांनी या सेरेमनीत रंगत आणली.