‘हॅरी पॉटर’ची अफशान सप्टेंबरमध्ये भारतात येणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 16:08 IST
‘हॅरी पॉटर’ची अभिनेत्री अफशान अजाद सप्टेंबर महिन्यात हैदराबाद कॉमिक कॉन २०१६ मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात येणार आहे. मुळ बांग्लादेशाची ...
‘हॅरी पॉटर’ची अफशान सप्टेंबरमध्ये भारतात येणार!
‘हॅरी पॉटर’ची अभिनेत्री अफशान अजाद सप्टेंबर महिन्यात हैदराबाद कॉमिक कॉन २०१६ मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात येणार आहे. मुळ बांग्लादेशाची ही अभिनेत्री भारतात प्रथमच येत असल्याने खूपच उत्साहित आहे. हिटेक्स एक्जीबिशन सेंटरमध्ये दोन दिवसीय संमेलन २४ व २५ सप्टेंबरमध्ये आयोजित केले जाणार आहे. अफशान म्हणते की, ‘मी भारतात यायला आणि हैदराबाद कॉमिक कॉममध्ये माझ्या चाहत्यांना पाहण्यासाठी खूपच उत्साहित आहे.’कार्यक्रमात ती आपल्याबाबतीत चर्चा करेल आणि चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरदेखील देईल. कॉमिक कॉम इंडियाचे संस्थापक जतिन वर्माने सांगितले की, ‘मी अफशानच्या स्वागतासाठी खूपच उत्साही आहे. चाहत्यांना भेटण्याची ही पहिलीच वेळ असेल.’या कार्यक्रमात अन्य काही आंतरराष्ट्रीय दिग्गजही असतील.