‘हानीकारक बापू’ वादात, आमिर अडचणीत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 14:33 IST
a trust oppese bapu world in film dangal song hanikarak bapu : एका सोशल सर्व्हिस ट्रस्टने आमिरच्या ‘दंगल’ या आगामी चित्रपटातील ‘हानिकारक बापू’ गाण्यावर आक्षेप घेतला आहे. या गाण्यातील ‘हानिकारक बापू’ या गाण्यावर ट्रस्टने आक्षेप नोंदवत, ते चित्रपटातून गाळून टाकण्याची मागणी केली आहे.
‘हानीकारक बापू’ वादात, आमिर अडचणीत?
बॉलिवूडच्या एखाद्या ‘खान’चा चित्रपट आला अन् वाद नाही झाला, असे क्वचितच पाहायला मिळते. यावेळी वादात सापडला आहे तो बॉलिवूड ‘खान’ आमिर खान. होय, एका सोशल सर्व्हिस ट्रस्टने आमिरच्या ‘दंगल’ या आगामी चित्रपटातील ‘हानिकारक बापू’ गाण्यावर आक्षेप घेतला आहे. या गाण्यातील ‘हानिकारक बापू’ या गाण्यावर ट्रस्टने आक्षेप नोंदवत, ते चित्रपटातून गाळून टाकण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘दंगल’मधील हे गाणे रिलीज झाले. विश्वात्मक सामाजिक ट्रस्ट नामक संस्थेने या गाण्यातील ‘बापू’ शब्दाला विरोध केला आहे. शिवाय आमिरविरोधात शांतता मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. महात्मा गांधींना ‘बापू’ म्हणून संबोधले जाते. असे असताना या शब्दासोबत ‘हानीकारक’ शब्द जोडला जाणे गैर आहे, असे ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रशेखर स्वामी यांनी म्हटले आहे. हा शब्द गाण्यातून गाळला जावा अन्यथा याविरोधात शांतता मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ हा चित्रपट पहेलवान महावीर सिंह फोगट यांच्या आयुष्यावर आधारित आहे. पुरूषांचे क्षेत्र मानल्या जाणाºया कुस्ती आखाड्यात महावीर सिंह आपल्या मुलींना उतरवतो आणि त्यासाठी जीव तोडून मेहनत घेतो, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. ‘हानीकारक बापू’ या गाण्यात महावीर यांच्या तीन मुली वडिलांना प्रेमाने ‘बापू’ म्हणून संबोधत आहेत.