हृतिक रोशनचा डुप्लिकेट म्हणूनच अधिक लोकप्रिय झालेला हरमन बावेजा सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अलीकडेच हरमनचा हेल्थ कोच साशा रामचंदानीसोबत साखरपुडा पार पडला. हरमनची बहीण रोवेनाने सोशल मीडियावर दोघांच्या रोका सेरेमनीचा फोटो शेअर करत, दोघांना शुभेच्छा दिल्या होत्या.
हरमन नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्याला घेऊन चर्चेत राहिला. प्रोफेशनल लाईफपेक्षा त्याचे पर्सनल आयुष्य जास्त चर्चेत राहिले. हरमनचे अभिनेत्री प्रियंका चोप्रासोबत अफेअर होते. दोघांचे नातं तब्बल दोन वर्षे टिकलं. पण नंतर दोघे वेगळे झाले.
हरमन आणि प्रियंकाची मैत्री 2008मध्ये 'लव्ह स्टोरी २०५०’च्या सेटवर झाली होती. प्रियंकासोबत त्याची मैत्री चांगलीच बहरली. पुढे दोघेही एकमेकांच्या प्रेमातही पडले. अर्थात ‘वॉट्स यॉर राशी’ या चित्रपटाच्या रिलीजपूर्वी दोघांचेही ब्रेकअप झाले. एका मुलाखतीत हरमनने या ब्रेकअपमागचे कारण सांगितले होते.
‘माझ्याकडे प्रियंकासाठी वेळ नव्हता. माझे आधीच दोन सिनेमे फ्लॉप झाले होते. अशात मला ‘वॉट्स यॉर राशी’ हा सिनेमा मिळला. माझ्यावरचा दबाव वाढला होता. हा चित्रपट फ्लॉप होता कामा नये, हा माझा प्रयत्न होता. माझा संपूर्ण फोकस या चित्रपटावर होता. शिवाय दिग्दर्शकानेही मला पर्सनल रिलेशन बाजूला ठेवून कामावर लक्ष देण्याची तंबी दिली होती. प्रियंकाला माझा वेळ हवा होता. पण मी वेळ देऊ शकत नव्हतो. यामुळेच आमच्यात मतभेद निर्माण झालेत आणि आम्ही वेगळे झालोत,’ असे त्याने सांगितले होते.
काही मीडिया रिपोर्टनुसार हरमनचे पाठोपाठ अनेक चित्रपट फ्लॉप झाल्याने प्रियंकाने त्याच्यासोबतचे नाते तोडले, अशीही चर्चा त्याकाळात होती. अर्थात हरमनने ही चर्चा नाकारली होती.