Join us

हार्दिक पांड्याची नवीन गर्लफ्रेंड माहिका शर्मा लवकरच देणार गुड न्यूज, फोटो शेअर करत म्हणाली - "ही प्रतीक्षा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 17:51 IST

Mahieka Sharma : मॉडेल माहिका शर्मा सध्या क्रिकेटर हार्दिक पांड्याला डेट करत असल्यामुळे चर्चेत आहे. माहिका सध्या मालदिव्समध्ये क्रिकेटरसोबत तिचा बर्थडे सेलिब्रेट करत आहे.

मॉडेल माहिका शर्मा सध्या क्रिकेटर हार्दिक पांड्याला डेट करत असल्यामुळे चर्चेत आहे. माहिका सध्या मालदिव्समध्ये क्रिकेटरसोबत तिचा बर्थडे सेलिब्रेट करत आहे. माहिका सतत मालदिव्समधील तिचे आणि हार्दिक सोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत आहे. यादरम्यान माहिकाने लवकरच खुशखबर देणार असल्याचे सांगितले.

खरेतर माहिका शर्माने यंदा दिल्लीत पार पडलेल्या लॅक्मे फॅशन वीकला हजेरी लावली आहे. अशात तिच्या फ्रेंड्सनी इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात लिहिलं की, या सीझनमध्ये मला तुझी खूप आठवण आली, पण या घोषणेसाठी नेहमीच वाट पाहिली. ही पोस्ट रिशेअर करत माहिका शर्माने लिहिले की, उफ्फ, किती प्रेम... लवकरच तुमच्या सर्वांची भेट होईल. विश्वास ठेवा ही प्रतीक्षा वाया जाणार नाही.

हार्दिकसोबतचे शेअर केले फोटोमाहिका शर्माने इंस्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत. यातील दोन फोटोत तिने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. यात ती खूप स्टनिंग दिसते आहे. यासोबतच तिने फूडचे फोटोही शेअर केले आहेत. यातील एका कोलाज फोटोत हार्दिक पांड्याचा हात पकडल्याचाही फोटो पाहायला मिळत आहे.

कोण आहे माहिका शर्मा?माहिका शर्माबद्दल बोलायचं झालं तर, ती फॅशन इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय चेहरा आहे. तिने अनेक टॉप डिझायनर्ससोबत काम केले आहे. माहिकाला इंडियन फॅशन अवॉर्ड्स २०२४ मध्ये 'मॉडेल ऑफ द इयर (न्यू एज)' म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

माहिकापूर्वी हार्दिक जॅस्मिन वालियासोबत होता रिलेशनशीपमध्येरिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्याने २०२० मध्ये सर्बियन मॉडेल आणि अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविकसोबत लग्न केले होते. त्यांना एक मुलगाही आहे. मात्र, २०२४ मध्ये हार्दिक आणि नताशा यांनी घटस्फोट घेतला. नताशासोबत घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिकचे नाव जैस्मिन वालियासोबत जोडले जात होते. पण आता माहिका शर्मासोबतचे फोटो शेअर करून हार्दिकने आपले नाते जाहीर केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hardik Pandya's New Girlfriend Mahieka Sharma Hints at 'Good News'

Web Summary : Model Mahieka Sharma, rumored to be dating Hardik Pandya, celebrated her birthday with him in the Maldives. Sharma hinted at an upcoming announcement via an Instagram story, sparking speculation. She was recently honored as 'Model of the Year'.
टॅग्स :हार्दिक पांड्या