आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर'हा चित्रपट देशांतर्गत आणि परदेशात बॉक्स ऑफिसवर अत्यंत यशस्वी ठरला आहे. मध्य पूर्व आणि पाकिस्तानमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता. पण, नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर पाकिस्तानात 'धुरंधर'ची क्रेझ पाहायला मिळाली. 'धुरंधर'शिवाय आणखी एक सिनेमा आहे, जो पाकिस्तानात पाहिला जातोय, ज्याची चर्चा होतेय, तसेच त्या चित्रपटातील अनेक डायलॉगवर महिला रील, मीम्स बनवत असून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाचं 'धुरंधर'शीदेखील खास कनेक्शन आहे.
तर तो चित्रपट म्हणजे हक. अभिनेत्री यामी गौतम आणि इमरान हाश्मीची मुख्य भूमिका असलेला हक सिनेमा ७ नोव्हेंबर २०२५ ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या कोर्टरुम ड्राम असलेल्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तितकसं यश मिळालं नाही. परंतु, ओटीटीवर रिलीज होताच या चित्रपटाला सगळ्यांची वाहवाह मिळते आहे. यावर आता चित्रपटाचे दिग्दर्शक सुपर्ण वर्मा यांनी आनंद व्यक्त केला आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक सुपर्ण वर्मा म्हणाले, "'हक' हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी बनवला आहे. पाकिस्तान असो, नायजेरिया, बांगलादेश, यूएई, बहरीन, यूके, न्यूझीलंड, कॅनडा किंवा अमेरिका, सर्वत्र विविध समुदायांतील आणि विविध वयोगटातील महिलांमध्ये या चित्रपटाने खोलवर परिणाम केला आहे". त्यांच्या मते, हा विषय केवळ एका देशापुरता मर्यादित नसून महिलांच्या अधिकारांशी संबंधित असल्याने तो जगभरातील प्रेक्षकांना भावतो आहे.
सोशल मीडियावर व्हायरल ट्रेंड
सुपर्ण वर्मा यांनी सांगितले की यूके, अमेरिका आणि यूएईसह अनेक देशांमध्ये चित्रपटाशी संबंधित हजारो TikTok व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ते म्हणाले, "मी सध्या एलएमध्ये आहे आणि यूके, यूएस, यूएईमध्ये जे TikTok व्हिडrओ व्हायरल झाले आहेत, ते हजारोंच्या संख्येने पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट अनेकांसाठी खूप वैयक्तिक ठरला आहे. तो इतक्या लोकांच्या भावना आणि अनुभवांशी जोडला गेला आहे, हे पाहून आनंद होतोय".
'हक' हा सिनेमा शहाबानो यांच्यावर आधारित आहे. पेशाने वकील असलेला पती त्यांना सोडून जातो आणि त्यानंतर घटस्फोट आणि पोटगीसाठी त्या न्यायालयापर्यंत धाव घेतात. अखेरीस ही वैयक्तिक लढाई महिलांचे हक्क, धर्म आणि न्यायापर्यंत पोहोचते. सुपर्ण.एस.वर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे एकीकडे धुरंधर सिनेमाची चर्चा असताना आता ओटीटीवर या सिनेमाला सर्वाधिक पसंती मिळताना दिसते आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर तुम्ही पाहू शकता.
Web Summary : After 'Dhurandhar,' 'Haq' gains popularity on OTT. Directed by Suparn Verma, starring Yami Gautam and Emraan Hashmi, it resonates globally, especially with women, addressing women's rights and justice, sparking viral trends.
Web Summary : ओटीटी पर 'धुरंधर' के बाद 'हक' को मिली लोकप्रियता। यामी गौतम और इमरान हाशमी अभिनीत, सुपर्ण वर्मा द्वारा निर्देशित, यह महिलाओं के अधिकारों और न्याय को संबोधित करते हुए वैश्विक स्तर पर प्रतिध्वनित होती है।