सैनिकांना मानवंदना देत मग तो या व्हिडिओमध्ये कविता म्हणतो. तिचा स्वैरानुवाद असा : आमचे पाय गालिच्यावर तर ते खडकाळ जमिनीवर उभे राहतात, आमचे आयुष्य सुरक्षित आणि स्थिर तर त्यांचे नव्या आव्हानांनी भरलेले, आमची रात्र सुखाची तर त्यांची तणावाची, आपण आयुष्य जगू शकतो कारण ते त्यांचे आयुष्य देशासाठी देतात, त्यांच्या कर्तृत्वाची जाण आपण विसरू नये कारण त्यांच्या खडतर जीवनाची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही, हे सैनिकांचेच शौर्य आहे, ज्यामुळे आपण पुढे जातोय, आणखी मोठे होतोय!शाहरुखसह सलमान खान, अक्षय कुमार, आमिर खान यांनीसुद्धा सैनिकांना दिवाळी संदेश दिला आहे. शाहरुखने ‘फौजी’ या टीव्ही शोमध्ये सैनिकाची भूमिका केली होती. तसेच ‘वीर-जारा’, ‘मैं हु ना’ आणि ‘जब तक है जान’ या सिनेमांतदेखील त्याने आर्मी मॅन साकारला आहे.#संदेश२सोल्जर या हॅशटॅगसह देशवासीयांनी सैनिकांना दिवाळी संदेश पाठण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. दिवाळी दरम्यान ट्विटरवर तो ट्रेंडिंग हॅशटॅग ठरला होता.Wishing everyone a Happy Diwali. May the Festival of Lights bring with it brightness and goodness in all our lives. Be safe and enjoy. pic.twitter.com/iuHMQpAMgd— Shah Rukh Khan (@iamsrk) 30 October 2016
सैनिकांना शाहरुखच्या काव्य शुभेच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 13:44 IST
संपूर्ण देशामध्ये दिवाळीची धुमधाम सुरू असताना आपले सैनिक मात्र घरापासून दूर सीमेवर देशाचे रक्षण करीत आहे. त्यांना दिवाळी शुभेच्छा ...
सैनिकांना शाहरुखच्या काव्य शुभेच्छा!
संपूर्ण देशामध्ये दिवाळीची धुमधाम सुरू असताना आपले सैनिक मात्र घरापासून दूर सीमेवर देशाचे रक्षण करीत आहे. त्यांना दिवाळी शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैनिकांसाठी खास संदेश पाठवण्याची मोहिम हाती घेतली. त्यात सहभागी होत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुखने सैनिकांसाठी स्पेशल कविता लिहिली आहे.ट्विटरवर व्हिडिओ अपलोड करून त्याने सर्व देशवासीयांना आणि विशेष करून सैनिकांच्या परिवारातील सदस्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शन दिले की, दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात प्रकाश आणि आनंद भरभरून यावा. सुरक्षित दिवाळी साजरी करा.