Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मुबारका ’ साठी सूरजने दिल्या अथियाला शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2016 13:50 IST

अर्जुन कपूरच्या दुहेरी भूमिकेतील चित्रपट ‘मुबारका’ची चांगलीच चर्चा ‘बी टाऊन’मध्ये सुरू झालीय.चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत अथिया शेट्टी आणि इलियाना डिक्रूझ ...

अर्जुन कपूरच्या दुहेरी भूमिकेतील चित्रपट ‘मुबारका’ची चांगलीच चर्चा ‘बी टाऊन’मध्ये सुरू झालीय.चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत अथिया शेट्टी आणि इलियाना डिक्रूझ दिसतील. अलीकडेच अथिया चित्रपटाबद्दल किती नर्व्हस झालीय याबद्दलचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. पण, नुकतेच अथियाच्या एका जवळच्या मित्राने तिला शुभेच्छा दिल्याचे कळतेय. कोण आहे हा मित्र ठाऊक आहे का? होय, सूरज पांचोली याने तिला चित्रपटासाठी ‘बेस्ट विशेस’ देऊ केल्या आहेत. अनीस बाझमी यांचा ‘मुबारका’ चित्रपट चर्चेत असतानाच एका इव्हेंटवेळी बोलताना सूरज पांचोली म्हणाला,‘अथिया ही मुबारका चित्रपटासाठी सध्या चर्चेत आहे. हा तिचा दुसरा चित्रपट आहे. आम्ही ‘हिरो’ मध्ये एकत्र काम केले असल्याने आम्ही दोघे खुप चांगले मित्र आहोत. ती एक खुप चांगली अभिनेत्री आहे. तिला ‘मुबारका’ साठी मी शुभेच्छा देऊ इच्छितो. अनिल कपूर, रत्ना पाठक आणि अर्जुन कपूर यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत तिला काम करायला मिळतेय हे तिच्यासाठी एक कलाकार म्हणून खुप महत्त्वाचे आहे.’ ‘मुबारका’ मध्ये मामा-भतीजाची म्हणजेच अनिल कपूर आणि अर्जुन कपूर यांची जोडी प्रथमच आॅनस्क्रीन पहावयास मिळत आहे. दाक्षिणात्य ब्युटी इलियाना डिक्रुझ ही देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. सूरजकडेही काही असाईनमेंट्स आहेत पण, त्याबद्दल माहिती देण्यास त्याने नकार दिला. आदित्य पांचोली यांचा मुलगा सूरज पांचोली आणि सुनील शेट्टी यांची कन्या अथिया शेट्टी यांनी ‘हिरो’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. सलमानच्या मध्यस्थीमुळे दोघांचीही बॉलिवूड एन्ट्री एकदम स्पेशल झाली. आता पुन्हा हे दोघे एक त्र केव्हा दिसणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.