Happy Birthday Rani : घरच्यांची परवानगी घेऊन राणी मुखर्जीला डेटवर घेऊन गेला होता आदित्य चोप्रा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2018 13:49 IST
बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:चे वेगळेस्थान तयार करणारी अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा आज (२१ मार्च) ४० वा वाढदिवस. माजी दिग्दर्शक ...
Happy Birthday Rani : घरच्यांची परवानगी घेऊन राणी मुखर्जीला डेटवर घेऊन गेला होता आदित्य चोप्रा!
बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:चे वेगळेस्थान तयार करणारी अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा आज (२१ मार्च) ४० वा वाढदिवस. माजी दिग्दर्शक राम मुखर्जी आणि माजी पार्श्वगायिक कृष्णा मुखर्जी यांच्या घराण्यात राणीचा जन्म झाला. तिचा मोठा भाऊ राजा हा निर्माता आणि दिग्दर्शक आहे. अभिनेत्री काजोल आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीची ती चुलत बहिण आहे. बॉलिवूडचा दिग्गज दिग्दर्शक व निर्माता आदित्य चोप्रा याची पत्नी अशीही राणीची एक दुसरी ओळख आहे. चार वर्षांपूर्वी आदित्य व राणीच्या लग्नाच्या बातमीने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. आज राणीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊ या, आदित्य व राणीच्या प्रेमकथेबद्दल... पहिली भेट...राणी मुखर्जी व आदित्य चोप्रा यांची पहिली भेट एका रेस्टॉरंटमध्ये झाली होती. तेव्हा राणी बॉलिवूडमध्ये केवळ एक चित्रपट जुनी होती तर आदित्य ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’च्या यशामुळे चर्चेत होता. या रेस्टॉरंटमध्ये राणी व आदित्य दोघांचीही नजरानजर झाली. राणी आपल्याला पाहून भेटायला येईल, असा आदित्यचा अंदाज होता. पण आदित्यचा हा अंदाज खोटा ठरला. कारण राणीने आदित्यला भेटायला जायची जराही तसदी घेतली नाही. कदाचित हीच गोष्ट आदित्यला भावली. पुढे आदित्यनेचं ‘कुछ कुछ होता है’ साठी करण जोहरकडे राणीच्या नावाची शिफारस केली होती. अशी सुरू झाली लव्हस्टोरीपुढे हळूहळू राणी व आदित्य यांच्यात मैत्री झाली. दोघांनाही एकमेकांसोबत वेळ घालवणे आवडू लागले. आदित्य याच काळात राणीच्या प्रेमात पडला. पण राणीच्या मते, त्यावेळी तिच्या मनात अशी कुठलीही फिलींग नव्हती. ‘आमच्यात रोमान्स नव्हता. पण मीडियात आमच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. कदाचित याचमुळे आम्ही अधिक जवळ आलोत,’ असे राणीने एका मुलाखतीत सांगितले होते.पहिली डेटराणीला पहिल्या डेटवर घेऊन जाण्याच्या बाबतीत आदित्य चांगलाच ट्रॅडिशनल निघाला. आदित्य राणीच्या घरी गेला आणि तिच्या आईवडिलांकडे राणीला डेटवर नेण्याची रितसर परवानगी मागितली. आदित्यच्या या अंदाजावर राणीत मनातून कमालीची भाळली होती. डेटींग नंतरकाही काळ डेटींग केल्यानंतर आदित्य व राणी या दोघांनीही हे नाते जाहिर न करण्याचा निर्णय घेतला. कारण दोघांनाही एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ हवा होता. तिकडे राणी व आदित्याच्या रिलेशनशिपच्या बातम्यांनी आदित्यची पहिली पत्नी पायल खन्ना संतापली. पुढे ही गोष्ट घटस्फोटापर्यंत गेली. मीडियाने या घटस्फोटासाठी राणीला जबाबदार ठरवले. पण राणीने अनेकदा हा आरोप खोडून काढला. तिच्या मते, तिची व आदित्यची प्रेमकहाणी आदित्यच्या घटस्फोटानंतर सुरु झाली होती.अचानक आली लग्नाची बातमी२१ एप्रिल २०१४ रोजी अचानक राणी व आदित्यच्या लग्नाची बातमी आली. या बातमीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दोघांनीही इटलीत अतिशय जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत गुपचूप लग्न केले. या लग्नाला आता चार वर्षे झाली आहेत. दोघांनाही आदिरा नावाची एक मुलगी आहे.ALSO READ : शिक्षकांमुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला मिळतो आकार -राणी मुखर्जी