Join us

Happy Birthday Kareena Kapoor: 'या' अटीवर सैफ अली खानसोबत लग्नाला तयार झाली होती बेबो

By गीतांजली | Updated: September 21, 2020 17:16 IST

करिना कपूर खान आज आपला 40 वा वाढिवस साजरा करते आहे.

करिना कपूर खान आज आपला 40 वा वाढिवस साजरा करते आहे. करिना दुसऱ्यांदा आई होणार आहे. वयाच्या 40 व्या वर्षी ही करिना तितकीच सुंदर दिसते. करिना आणि सैफ हे बॉलिवूडमधले पॉवर कपल पैकी एक आहे. या दोघांची लव्हस्टोरी कशी सुरु झाली हे फार कमी लोकांना माहिती आहे. तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण सैफशी लग्न करण्यासाठी करिनाने त्याच्यासमोर एक अट ठेवली होती.

अशी सुरु झाली लव्हस्टोरी'टशन' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान करीना आणि सैफ एकमेकांच्या जवळ आले होते. याबाबत करीनानं सांगितले की, ''प्रेम व्यक्त करण्यासाठी सैफ कधीही स्वतःहून पुढाकार घेणार नाही, हे मला माहिती होते. म्हणून माझ्या परिनं मी सर्व ते प्रयत्न केले. जेव्हा माझे प्रेम मी व्यक्त केले त्यावेळी करीना कपूर असं काही करतेय, यावर माझा विश्वास बसत नाही, असे सैफनं म्हटले होते.'' शूटिंगनिमित्त आम्ही पॅरिसमध्ये एकत्र होतो. त्यावेळेस सैफनं लग्नासाठी प्रपोज केल्याचं करीनानं सांगितलं.

करिनाने ठेवली होती अटकएका मुलाखतीदरम्यान करीनानं आपल्या लग्नाची गोष्ट सविस्तरपणे मांडली. पुढे करिना म्हणाली, याबाबत करीनाने सांगितले की, 'आम्ही पॅरिसच्या एका हॉटेलमध्ये असताना सैफनं मला लग्नासाठी पहिल्यांदा प्रपोज केलं त्यावेळी मी सैफ समोर लग्नानंतर ही चित्रपटात काम करण्याची अट समोर ठेवली होती. सैफलाही या गोष्टीपासून काही प्रोब्लेम नव्हता.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर करिना लवकरच आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा'चे शूटिंग मुंबईत सुरु करणार आहे. लाल सिंग चड्ढा’ आहे हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेक आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान