Join us

Happy Birthday कॅरल ग्रेशियस, रॅम्पवॉकच्यावेळीopps momentलाही बळी पडली होती कॅरल? जाणून घ्या तिच्याविषयी कधीही न ऐकलेल्या 'या' खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2016 13:08 IST

फॅशनच्या दुनियेतील एक प्रसिद्ध नाव म्हणजे कॅरल ग्रेशियस. मॉडेलिंगच्या क्षेत्रातील कामामुळे कॅरलने विशेष ओळख निर्माण केली आहे. फॅशन शो ...

फॅशनच्या दुनियेतील एक प्रसिद्ध नाव म्हणजे कॅरल ग्रेशियस. मॉडेलिंगच्या क्षेत्रातील कामामुळे कॅरलने विशेष ओळख निर्माण केली आहे. फॅशन शो कुठलाही असो त्या शोचं आकर्षण कॅरल असेल तर तिला पाहण्यासाठी सारेच उत्साही असतात. बोल्ड, ब्युटीफूल, बिनधास्त अंदाज यामुळे कॅरलने रसिकांवर वेगळी छाप पाडली आहे. 28 डिसेंबर हा कॅरलचा वाढदिवस. याचनिमित्त फॅशनच्या जगातील या मॉडेलविषयी. कॅरल ग्रेशियस म्हटले की सा-यांच्या नजरेसमोर येतो तो रॅम्पवर घडलेला एक प्रसंग. या रॅम्पवॉकमुळे कॅरल रातोरात प्रसिद्ध झाली. रॅम्पवॉक म्हटले की देशातील प्रत्येकाच्या ओठावर कॅरलचे नाव येऊ लागले. एका फॅशन शो दरम्यान कॅरलचा टॉप घसरला आणि तिला OPPS मोमेंटला सामोरं जावे लागले. या सगळ्या प्रकारामुळे कॅरल कुठेही डगमगली नाही. प्रसंगावधान राखत तिने मोठ्या धाडसाने टॉप सावरत त्याच अवस्थेत रॅम्प वॉक पूर्ण केला. या प्रकारानंतर कॅरलची सगळ्याच माध्यमात जोरदार चर्चा झाली. या सगळ्या प्रकारात कॅरलचा पब्लिसिटी स्टंट होता की काय अशीही चर्चा झाली. कॅरलने परिधान केलेला ड्रेस पाठीमागे बांधण्यात येणा-या नॉट योग्यरित्या बांधल्या नव्हत्या. त्यामुळे नॉट बांधूनही चालता चालता त्या सुटल्या आणि कॅरलला या अवघडलेल्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. रॅम्पवॉक यशस्वीरित्या पूर्ण केल्याने त्यावेळी कॅरलचे अनेकांकडून तोंडभरुन कौतुक झाले. तर काहींनी कॅरलवर विखारी टीकासुद्धा केली. मात्र कॅरलच्या जागी दुसरी एखादी मॉडेल असती तर तिने या प्रसंगाचा कशारितीने सामना केला असता ? ती बेधडक आणि बिनधास्तरित्या अशा प्रसंगाला सामोरे गेली असती का ? तर अनेकांचे उत्तर नाही असेच आले असते. त्यामुळे त्यावेळी कॅरल प्रसिद्धीच्या झोतात आली आणि मॉडेलिंग क्षेत्रात ती वेगळी मॉ़डल ठरली. मॉडेलिंगच्या जगात ओळख निर्माण करणारी कॅरल काही गाणी आणि त्यानंतर रियालिटी शोमध्येही झळकली. 2007 साली बिग बॉस या रियालिटी शोमध्येही कॅरलचा बेधडक आणि बिनधास्त अंदाज रसिकांना पाहायला मिळाला. मध्यंतरीच्या काळात कॅरल, तिचे वॉडरोब मालफंक्शन, बिग बॉसमधील एंट्री याच्या खुमासदार चर्चा रसिकांमध्ये रंगत होत्या. काही महिन्यांपूर्वी कॅरल पुन्हा एकदा रॅम्पवर अवतरणार अशी बातमी आली. एका ब्रेकनंतर कॅरल रॅम्पवर येणार म्हटल्यावर त्याची उत्सुकता रसिकांमध्ये होती. त्यामुळे सा-यांच्या नजरा फक्त कॅरल आणि तिच्या रॅम्पवॉककडेच होत्या. कॅरलचा हा रॅम्पवॉकसुद्धा खास आणि विशेष ठरणार का याची उत्कंठा रसिकांना होती. अखेर कॅरल रॅम्पवर अवतरली आणि तिने पुन्हा सा-यांच्या नजरा आकर्षित केल्या. ज्यावेळी कॅरल रॅम्पवर आली त्यावेळी ती प्रेग्नंट होती. त्यामुळे बेबी बम्पसह कॅरलने रॅम्पवॉक पूर्ण केले. फॅशन का है ये जलवा या गाण्याप्रमाणे फॅशनच्या या जगमगत्या दुनियेत कॅरल कायमच चर्चेत राहिली. कधी लग्नामुळे तर कधी वैयक्तीक जीवन, यामुळे कॅरलचे आयुष्य वादळी ठरले. यामुळेच की काय कॅरलच्या जीवनात घडलेला वॉर्डरॉब मालफंक्शनचा सीन रुपेरी पडद्यावरही साकारण्यात आला. वास्तववादी सिनेमा करणारे दिग्दर्शक अशी ओळख असलेले मधुर भांडारकर यांनी कॅरलच्या बाबतीत घडलेला टॉप घसरण्याचा सीन फॅशनमध्ये चित्रीत केला होता. अभिनेत्री कंगणा राणौतवर हा सीन चित्रीत करण्यात आला होता. फॅशनच्या दुनियेत नाव कमावलेली मॉडेल कॅरल विविध कारणांमुळे कायमच चर्चेचा विषय ठरते. मात्र परिस्थिती कशीही असो तिचा खंबीरपणे आणि नीडरपणे सामना करणारी तसेच ते पूर्ण काम करणारी मॉडेल म्हणजे कॅरल ग्रेशियस असेच म्हणावे लागेल.