Join us

अजय देवगणने आईसोबतचा फोटो शेअर करीत दिल्या महिला दिनाच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 16:30 IST

अभिनेता अजय देवगणने आपल्या सोशल अकाउंटवर एक फोटो शेअर करीत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. हा फोटो शेअर करताना ...

अभिनेता अजय देवगणने आपल्या सोशल अकाउंटवर एक फोटो शेअर करीत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. हा फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, आमच्याकडे महिला दिवस रोजच सेलिब्रेट केला जात असतो. अजयने शेअर केलेल्या फोटोत तो त्याच्या आईसोबत बघावयास मिळत आहे. त्याने लिहिले की, माझ्या आयुष्यातील पहिली महिला, जिने मला नेहमीच चांगली शिकवण दिली. आई, मुलगी, पत्नी आणि बहीण या सर्वांनीच हा दिवस साजरा करायला हवा. खरं तर रोजच साजरा करावा.’अजय देवगणने ही पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी त्याच्या या पोस्टला प्रचंड कॉमेण्ट्स दिल्या. अजयचे हे ट्विट चाहत्यांकडून चांगलेच पसंत केले जात असून, अजयचा शुभेच्छा देण्याचा हा अंदाज त्यांना खूपच भावल्याचे दिसून येत आहे. अजयच्या ट्विटला शुभेच्छा देताना एका चाहत्याने म्हटले की, सॅल्यूट आहे अशा आईला जिने एका महान अभिनेत्याला जन्म दिला.’ अजयने आपल्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. एका मुलाखतीत त्याने याबाबतचा खुलासा केला होता की, तो त्याच्या मुलीला त्याचा सर्वात मोठा क्रिटिक मानतो. त्याने म्हटले होते की, काजोल माझ्यात काहीच उणिवा काढत नाही. परंतु मुलगी न्यासा ही माझ्यातील उणिवा काढण्यात अव्वल आहे. त्यामुळे ती माझी सर्वात मोठी क्रिटिक आहे.  दरम्यान, अजय देवगण सध्या त्याच्या आगामी ‘रेड’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो एका टॅक्स आॅफिसरची भूमिका साकारत आहे. चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटात ती अजयच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.