Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउनमध्ये बॉलिवूडच्या अभिनेत्रीचे झाले असे हाल, स्वतःच कापले स्वतःचे केस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 19:36 IST

बॉलिवूडची ही अभिनेत्री लॉकडाउनमध्ये आली आहे चर्चेत

लॉकडाउनमध्ये बॉलिवूडचे कित्येक कलाकार त्यांच्या पार्टनरचे किंवा दुसऱ्या सदस्यांचे केस कापताना पहायला मिळाले होते. अनुष्का शर्मा तिचा नवरा विराट कोहलीचे केस कापताना दिसली होती. तसेच टिस्का चोप्रा, श्वेता तिवारी हेदेखील केस कापताना दिसले होते. आता या यादीत अभिनेत्री इलियाना डिक्रुझचा देखील समावेश झाला आहे.

इलियानाने इंस्टाग्रामवर स्टोरीवर नवीन फोटो शेअर करत सांगितले की, तिने स्वतःच स्वतःचे केस कापलेत. यासोबतच तिने तिचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यात तिचे लांब केस दाखवताना दिसते आहे. लॉकडाउनमध्ये सगळं बंद असल्यामुळे सेलिब्रेटींनाच हेअरस्टायलिस्ट बनावे लागले.

फोटो शेअर करून इलियानाने लिहिले की, मी माझे केस कापले. इतकेपण वाईट नव्हते. असे मी शेवटचे तेव्हा केले होते जेव्हा मी सात वर्षांची होती आणि मी माझ्या बाहुलीचे केस कापले होते.

सोशल मीडियावर इलियाना खूप एक्टिव्ह असते. एका मुलाखतीत तिने सांगितले होते की, सोशल मीडियावर तुम्ही नवीन नाती बनवू शकतात. आधी आपण आपल्या प्रत्येक जवळच्या व्यक्तीला भेटू शकत नव्हतो. सोशल मीडियामुळे हे शक्य झाले आहे. माझ्या चाहत्यांसोबतही माझ्या जीवनातील पैलू दाखवायचे आहेत. लोकांना समजले पाहिजे की, आम्हीदेखील साधारण आहोत. आम्ही ज्या लूकमध्ये दिसतो त्यात येण्यासाठी दोन तास लागतात. मी खूप साधारण मुलगी आहे आणि लोकांनी मला तसेच ओळखावे असे मला वाटते.

टॅग्स :इलियाना डीक्रूज