‘हा’ रणवीर चिंग तुम्ही पाहायलाच हवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2016 22:09 IST
हॉलिवूडचा आॅस्कर विजेता ‘मॅड मॅक्स’ हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर ही जाहिरात पाहिल्यानंतर तुम्हाला तो नक्की आठवेल. या जाहिरातीत रणवीर सिंहचा ग्लॅडिएटर लूक पाहायला मिळत आहे. शिवाय सलवार-कमीज, कपाळावर टिकली आणि लांब वेणी या गेटअपमध्येही तो दिसणार आहे.
‘हा’ रणवीर चिंग तुम्ही पाहायलाच हवा!
हॉलिवूडचा आॅस्कर विजेता ‘मॅड मॅक्स’ हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर ही जाहिरात पाहिल्यानंतर तुम्हाला तो नक्की आठवेल. अभिनेता रणीवर सिंह याने काही दिवसांपुर्वी ट्विटरवर एक पोस्टर शेअर करुन रोहित शेट्टीसोबत काम करत असल्याचे सांगितले होते. या पोस्टरमुळे चाहत्यांची उत्कंठा प्रचंड वाढली होती. पण रोहित व रणवीर कुण्या सिनेमात नाही तर एका जाहितरातीत एकत्र आलेत. रोहित शेट्टीने या जाहिरातीचे दिग्दर्शन केले आहे. पण ही नुसती जाहिरात नाही तर हॉलिवूड सिनेमाच्या तोडीची ही जाहिरात आहे. ‘रणवीर चिंग रिटर्न्स’नावाचे हे जाहिरातचे कॅम्पेन करण्यात आले आहे. या जाहिरातीत रणवीरचा ग्लॅडिएटर लूक पाहायला मिळत आहे. शिवाय सलवार-कमीज, कपाळावर टिकली आणि लांब वेणी या गेटअपमध्येही तो दिसणार आहे. रणवीर सिंगसोबत या जाहिरातीत अभिनेत्री तमन्ना भाटियादेखील झळकणार आहे. जगात होत असलेला अन्नाचा तुटवडा आणि त्यामुळे त्रस्त झालेले लोक यांच्या रक्षणकर्त्याच्या रुपात आलेला रणवीर सिंग त्यांना मदत करणार आहे, असे या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आले आहे. तेव्हा डोन्ट मिस इट!!