Join us

इंटिमेट सीन्स देण्यासाठी गुरमितचा देबीनालाही असणार सपोर्ट ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2016 15:29 IST

आपले पावित्र्य पटवून देण्यासाठी साक्षात सीता माईलाही अग्निदिव्यातून जावे लागले होते. सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली होते हे आपण पौराणिक ...

आपले पावित्र्य पटवून देण्यासाठी साक्षात सीता माईलाही अग्निदिव्यातून जावे लागले होते. सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली होते हे आपण पौराणिक कथा आणि मालिकांमध्ये ऐकले आहे. मात्र कलयुगातील सीतेला मात्र अशी अग्निपरीक्षा देण्याची गरज नाही. असे आम्ही का म्हणतो आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचे कारण आहे छोट्या पडद्यावर गाजलेल्या रामायण या मालिकेत राम आणि सीताची भूमिका साकारणा-या कलाकारांचा एकमेकांवर असलेला विश्वास. या मालिकेत गुरमित चौधरीने प्रभू श्रीरामाची तर त्याची पत्नी देबिनाने सीता मातेची भूमिका साकारली होती. दोघे रियल लाइफ पती पत्नी या पौराणिक मालिकेच्या निमित्ताने राम-सीता या पौराणिक पती-पत्नीच्या भूमिकेत पाहायला मिळाले. या दोघांचा आपल्या नात्यावर आणि एकमेंकांवर इतका विश्वास आहे की कोणतीही गोष्ट त्यांच्या प्रेमात मिठाचा खडा टाकूच शकत नाही. वजह तुम हो या सिनेमात गुरमितने सना खानसह इंटिमेट आणि बोल्ड सीन्स दिलेत. या सीन्सला त्याची पत्नी देबिनाने पूर्णपणे पाठिंबा दर्शवलाय. आता अशाच प्रकारचा बोल्ड आणि इंटिमेट सीन करण्याची वेळ देबिनावर आली तर आपलाही तिला नक्कीच पाठिंबा असेल असे गुरमितने सांगितले आहे. देबिनासुद्धा एक कलाकार आहे आणि तिला एखाद्या सिनेमात बोल्ड किंवा इंटिमेट सीन करावा लागला तर आपली हरकत असणार नाही असेही गुरमित मोठ्या विश्वासाने सांगतो. तिच्या सिनेमाची कथा तशी असेल आणि कथेची मागणी असेल तर तिने तो सीन का करु नये असा सवालही तो विचारतो. अशा सीनला आपण विरोध करणार नाही किंवा त्यामुळे आपल्याला तिच्याबद्दल ईर्षासुद्धा वाटणार नाही असेही त्याने सांगितले. ज्यारितीने देबिना प्रत्येक गोष्टीत आपल्या पाठिशी ठामपणे उभा राहते त्यारितीने मीसुद्धा खंबीरपणे तिच्या पाठिशी उभे राहणार असून ती आपली जबाबदारीच असेल अशी ग्वाही गुरमितने दिली आहे. त्यामुळे या रिल रामाचा रिल सीतेवरील या नात्यातील विश्वासाला मानलेच पाहिजे, नाही का ?