Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदाचा टॅक्सीतून प्रवास, बॉलिवूडच्या 'हिरो नंबर १'ची अशी अवस्था पाहून चाहत्यांना बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 11:05 IST

गोविंदा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

९० च्या दशकात आपल्या डान्स आणि अभिनयाने बॉक्स ऑफिसवर राज्य करणारा सुपरस्टार गोविंदा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. उत्तर प्रदेशच्या रस्त्यांवर गोविंदा चक्क एका साध्या 'ऑरा' टॅक्सीतून प्रवास करताना दिसला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये त्याच्या सद्यस्थितीबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये गोविंदा "भारत सरकार" असे लिहिलेल्या ह्युंदाई ऑरा टॅक्सीमध्ये बसलेला दिसत आहे. एकेकाळी महागड्या लक्झरी गाड्यांच्या ताफ्यात फिरणाऱ्या गोविंदाला अशा साध्या टॅक्सीत पाहून चाहते थक्क झाले. काही नेटकऱ्यांनी याला त्याची खालावलेली परिस्थिती म्हटले, तर काहींनी याला गोविंदाचा साधेपणा असल्याचे सांगितले. मात्र, हा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगचा भाग होता की खासगी कामासाठी, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शालेय कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळागोविंदा सध्या चित्रपटांपासून दूर असला, तरी त्याची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. नुकतीच त्याने उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील 'संगम इंटरनॅशनल स्कूल'सह दोन शाळांच्या वार्षिक समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. यावेळी त्याने आपल्या "मै तो रस्ते से जा रहा था" सारख्या गाण्यांवर ठेका धरला होता. 

टीकाकारांना गोविंदाचे चोख प्रत्युत्तरगेल्या काही दिवसांपासून गोविंदाच्या कामाबद्दल आणि पत्नी सुनीता आहुजासोबतच्या नात्याबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. यावर मौन सोडत गोविंदा म्हणाला, "प्रसिद्धी आणि संपत्तीसोबत षड्यंत्रही येतात. माझ्या शांत राहण्याला लोक माझी कमजोरी समजत होते, म्हणून आता उत्तर देणे गरजेचे आहे".

English
हिंदी सारांश
Web Title : Govinda Spotted in Taxi: Fans Shocked by 'Hero No. 1' Status

Web Summary : Superstar Govinda seen traveling in a taxi in Uttar Pradesh, sparking debate. Once known for luxury cars, his appearance in a simple taxi surprised fans, some speculating about his current situation. He recently attended a school event, silencing critics about his career and personal life.
टॅग्स :गोविंदा