बॉलिवूडचा ‘हिरो नंबर 1’ गोविंदा याच्या फिल्मी करिअरला आताश: ओहोटी लागली आहे. अलीकडच्या काळात गोविंदा अनेक नव-नवे चित्रपट घेऊन आला. पण ते सर्वचं फ्लॉप ’ठरलेत. नुकताच रिलीज झालेला त्याचा ‘रंगीला राजा’ हा चित्रपटही दणकून आपटला. अर्थात तरिही गोविंदा हार मानायला तयार नाही. विशेष म्हणजे आता गोविंदा आपल्या मुलालाही बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. होय, गोविंदाचा मुलगा यशवर्धन बॉलिवूडमध्ये येण्यास सज्ज आहे. याचा पुरावा हवा असेल तर यशवर्धनने त्याच्या सोशल अकाऊंटवर पोस्ट केलेला एक ताजा फोटो तुम्ही बघायलाच हवा. यात यशवर्धन काहीतरी तरी वाचताना दिसतोय. यावरून यशवर्धन लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार, असे मानले जात आहे.
गोविंदाचा मुलगा यशवर्धनने सुरु केली बॉलिवूडची तयारी! पाहा, फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 10:22 IST
होय, गोविंदाचा मुलगा यशवर्धन बॉलिवूडमध्ये येण्यास सज्ज आहे. याचा पुरावा हवा असेल तर यशवर्धनने त्याच्या सोशल अकाऊंटवर पोस्ट केलेला एक ताजा फोटो तुम्ही बघायलाच हवा
गोविंदाचा मुलगा यशवर्धनने सुरु केली बॉलिवूडची तयारी! पाहा, फोटो!!
ठळक मुद्देमध्यंतरी यशवर्धन निर्माता साजिद नाडियाडवालाच्या बॅनरखाली फिल्ममेकिंगचे धडे गिरवत असल्याची बातमी आली होती.