बॉलिवूड अभिनेता गोविंदा गेल्या कित्येक दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. गोविंदाच्या वैवाहिक आयुष्याबाबतही चर्चा सुरू आहेत. गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा एकत्र राहत नाहीत. पत्नीने गोविंदाचं एक्स्ट्रा मरेटिअल अफेअर असल्याचे आरोपही केले आहेत. एकीकडे गोविंदाच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा आलेला असतानाच त्याचं पर्सनल आयुष्यही दिवाळखोरीत निघाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. गोविंदावर कर्जाचा डोंगर असून त्याला घरही गहाण ठेवावं लागल्याचं म्हटलं जात आहे. या सगळ्या चर्चांवर अखेर गोविंदाच्या मॅनेजरने प्रतिक्रिया दिली आहे.
अलिकडेच गोविंदाचा टॅक्सीमधून जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. लक्झरियस कार असूनही गोविंदा टॅक्सीमधून का फिरतोय? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. त्यानंतर गोविंदा कॉलेजमधील एका इव्हेंटमध्ये डान्स परफॉर्म करत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. एकेकाळच्या सुपरस्टारवर कॉलेजमध्ये डान्स करण्याची वेळ का आली असावी, याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या होत्या. या सगळ्या अफवा असल्याचं गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हा यांनी म्हटलं आहे.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "गोविंदाकडे फक्त एक नव्हे तर अनेक गाड्या आहेत. तो दिवाळखोरीत निघालाय आणि भीक मागण्याची वेळ आलीये या सगळ्या अफवा आहेत. परफॉर्म करणं हा त्याच्या कामाचा एक भाग आहे. याचा अर्थ तो दिवाळखोरीत निघालाय असा होत नाही. एअरपोर्टवर खासगी वाहनं घेऊन जाण्याची परवानगी तेव्हा नव्हती म्हणून तो टॅक्सीने गेला. तो त्याच्या कुटुंबाचं पालनपोषण करतोय".
"त्याने कोटींचे ऑफर असलेले सिनेमे नाकारले आहेत. गेल्या काही वर्षात गोविंदाने एकही हिट सिनेमा दिलेला नाही. तरीदेखील अनेक मोठे निर्माते त्याच्या मागे आहेत. पण कधी कथा न आवडल्याने तर कधी काही अन्य कारणांमुळे त्याने कोट्यवधींच्या ऑफर नाकारल्या आहेत. याचा अर्थ त्याने काम करणं सोडून दिलं असा होत नाही. लवकरच एक मोठी घोषणा गोविंदा करणार आहे", असंही गोविंदाच्या मॅनेजरने सांगितलं आहे.
Web Summary : Rumors swirled about Govinda's financial woes after videos surfaced showing him using taxis and performing at a college event. His manager refuted claims of bankruptcy, stating Govinda has multiple cars and rejected crore-rupee film offers, clarifying the college performance was part of his work.
Web Summary : टैक्सी और कॉलेज कार्यक्रम में गोविंदा के प्रदर्शन के बाद उनकी आर्थिक तंगी की अफवाहें उड़ीं। उनके मैनेजर ने दिवालिया होने के दावों का खंडन किया, कहा कि गोविंदा के पास कई कारें हैं और उन्होंने करोड़ों के फिल्म प्रस्तावों को ठुकरा दिया।