Govinda Dance Video : एकेकाळी आपल्या नृत्याने आणि विनोदी शैलीने बॉलिवूडवर राज्य करणारा 'हिरो नंबर वन' गोविंदा अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. चाहते त्याच्या कमबॅकची वाट पाहत असतानाच तो सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. उत्तर प्रदेशातील एका शाळेच्या कार्यक्रमात गोविंदाने केलेल्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
प्रतापगडमधील एका शाळेच्या कार्यक्रमात गोविंदाने प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. यावेळी त्याने त्याच्या "यूपी वाला ठुमका लगाओ..." या सुपरहिट गाण्यावर डान्स केला, गाणी गायली आणि उपस्थितांशी संवादही साधला. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी याला दाद दिली असली, तरी सोशल मीडियावर मात्र त्याला टीकेचा धनी व्हावे लागले. व्हायरल व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलं, "किती हे पतन! एका सुपरस्टारला आज छोट्याशा शाळेत नाचायला लागतंय". दुसऱ्याने लिहिले, "वेळ कोणालाही सोडत नाही, ही काळाची महिमा आहे". काहींनी त्याच्या आर्थिक परिस्थितीवर आणि करिअरमधील चढ-उतारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र, गोविंदाच्या निष्ठावान चाहत्यांनी त्याची पाठराखण करत हा त्याचा साधेपणा असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, 'एएनआय'शी बोलताना गोविंदा म्हणाला, "माझ्याविरुद्ध एक मोठे षड्यंत्र रचले जात आहे, ज्याचा परिणाम माझ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यावर होत आहे. संपत्ती आणि प्रसिद्धी कोणालाही कायमची साथ देत नाही. मी इंडस्ट्रीतील एका मोठ्या अभिनेत्यासोबतही असे घडताना पाहिले आहे आणि आता तेच माझ्यासोबत घडतेय". तो पुढे म्हणाला की, तो एक साधा आणि धार्मिक माणूस आहे आणि आपल्या मुलांच्या रक्षणासाठी तो देवाकडे प्रार्थना करत आहे. दरम्यान, त्याची पत्नी सुनीता हिने अनेकदा गोविंदाच्या अफेअर्सबद्दल भाष्य केलंय, ज्याला गोविंदाने त्याच्याविरुद्धचा कट असल्याचे म्हटले आहे.
Web Summary : Govinda's dance at a school event in Uttar Pradesh drew criticism online. Some users questioned his career trajectory, while fans defended his simplicity. Govinda claims a conspiracy affects him.
Web Summary : उत्तर प्रदेश में एक स्कूल कार्यक्रम में गोविंदा के नृत्य की ऑनलाइन आलोचना हुई। कुछ उपयोगकर्ताओं ने उनके करियर प्रक्षेपवक्र पर सवाल उठाए, जबकि प्रशंसकों ने उनकी सादगी का बचाव किया। गोविंदा का दावा है कि एक साजिश उन्हें प्रभावित करती है।