बॉलिवूड अभिनेता गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबईतील एका इव्हेंटमध्ये गोविंदाने हजेरी लावली होती. मात्र या इव्हेंटमध्ये गोविंदाचे बाऊन्सर्स आणि पापाराझींमध्ये जोरदार भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. हा वाद इतका वाढला की गोष्टी हाणामारीपर्यंत पोहोचल्या होत्या. मात्र गोविंदाने प्रसंगावधान राखत हा वाद तिथेच मिटवला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, रविवारी(१७ मे) रात्री हा संपूर्ण प्रकार घडला. मुंबईतील एका कार्यक्रमाला गोविंदाने हजेरी लावली होती. त्याचे फोटो घेण्यासाठी पापाराझी पुढे आले. पण, त्याबरोबरच गोविंदाच्या चाहत्यांनीही अभिनेत्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. गोविंदाच्या सुरक्षेच्या कारणास्तव बाऊन्सर्सने पापाराझींना बाजूला ढकलण्यास सुरुवात केली. पापाराझींना मागे ढकलताना एका बाऊन्सरचा हात गोविंदाचे फोटो घेत असलेल्या पापाराझीला लागला आणि तिथेच वाद पेटला.
बाऊन्सर आणि पापाराझी यांच्यामध्ये धक्काबुकी झाली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की पापाराझी बाऊन्सरला म्हणतोय की "हात लावायचा नाही...". त्यानंतर गोविंदा त्याला समजवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अत्यंत शांतपणे गोविंदाने ही परिस्थिती सांभाळल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. गोविंदाने दाखवलेल्या समजूतदारपणामुळे त्याचं कौतुकही होत आहे.
Web Summary : Govinda's bouncers clashed with paparazzi at a Mumbai event after a photographer was pushed. An argument escalated, but Govinda intervened, calming the situation. Video of the incident went viral, drawing praise for Govinda's handling of the dispute.
Web Summary : मुंबई में एक कार्यक्रम में गोविंदा के बाउंसरों और पैपराजी के बीच झड़प हो गई। एक फोटोग्राफर को धक्का दिए जाने के बाद बहस बढ़ गई, लेकिन गोविंदा ने हस्तक्षेप करके स्थिति को शांत किया। घटना का वीडियो वायरल हो गया, जिसकी वजह से गोविंदा की प्रशंसा हो रही है।