Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गोलमाल ५' चा श्रीगणेशा! रामोजी फिल्म सिटी नाही तर महाराष्ट्रात 'या' ठिकाणी उभारला जातोय सेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 13:45 IST

'गोलमाल ५' साठी रोहित शेट्टीचा मोठा प्लॅन! अजय देवगणसह 'हा' जुना अभिनेताही परतणार

Golmaal 5 :  चित्रपटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. अजय देवगण आणि रोहित शेट्टी यांची 'गोलमाल' ही गँग पुन्हा एकदा पडद्यावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाली आहे. 'गोलमाल ५'च्या शूटिंगचे वेळापत्रक ठरले असून यावेळी रोहित शेट्टीने नेहमीची ठिकाणं सोडून शूटिंगसाठी एका खास जागेची निवड केली आहे.

रोहित शेट्टीचे चित्रपट सहसा हैदराबादची रामोजी फिल्म सिटी किंवा गोव्यात शूट होतात. मात्र, 'गोलमाल ५' साठी रोहितने मुंबईच्या फिल्म सिटीची निवड केली आहे. सध्या तिथे पोलीस स्टेशन, कॅफे आणि आलिशान घरांचे भव्य सेट उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण होईल आणि फेब्रुवारीच्या अखेरीस प्रत्यक्ष शूटिंगला सुरुवात होणार आहे.

मुंबईची निवड का केली?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व कलाकारांना दररोज वेळेवर शूटिंगला येता यावं आणि पॅकअप झाल्यानंतर त्यांना आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता यावा, या उद्देशाने रोहित शेट्टीने मुंबईतच शूटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

'गोलमाल ५' मध्ये अजय देवगण, अर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे आणि कुणाल खेमू हे दिसणार आहे. पण, सर्वात मोठं सरप्राइज म्हणजे, पहिल्या भागात दिसलेला शर्मन जोशी देखील पाचव्या भागात कमबॅक करण्याची दाट शक्यता आहे. तसेच यावेळी चित्रपटात एका 'महिला खलनायिके'च्या एन्ट्रीची चर्चा आहे. यासाठी करीना कपूर आणि सारा अली खान यांच्या नावांची चर्चा सुरू असली तरी, निर्मात्यांनी अद्याप कोणत्याही अभिनेत्रीच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, 'गोलमाल ५' हा २०२७ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Golmaal 5: Shooting begins in Mumbai, not Ramoji Film City.

Web Summary : 'Golmaal 5' shooting shifts to Mumbai Film City instead of Ramoji. Sets are being built, with Ajay Devgn and the gang returning. Release expected in 2027.
टॅग्स :रोहित शेट्टीअजय देवगण