Join us  

देवा, बेबी बंम्प असल्याचा फोटो शेअर करुनही अभिनेत्री चाहत्यानाच विचारते मी प्रेग्नंट आहे की पिझ्झा खाल्यामुळे असं दिसतंय !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 4:48 PM

Lisa Haydon dropped a new photo showing her baby bump :प्रेग्नंसीमध्ये 9 व्या महिन्यात बिकीनी फोटोशूट करत तिने सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. लीसा हेडन आता दोन मुलांची आई असल्यामुळे मदरहुड एन्जॉय करतेय.

अभिनेत्री लिसा हेडन तिसऱ्यांदा आई होणार आहे.येत्या जूनमध्ये ती बाळाला जन्म देणार आहे.खुद्द लिसानेच इन्स्टाग्रामने एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. तेव्हापासून तिच्या प्रेग्नंसी ती कशी एन्जॉय करतेय याविषयीच्या सगळ्याच अपडेट ती शेअर करत असते. नुकतेच तिने बेबी शॉवरदरम्यानचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर केला होता. शेअर केलेल्या फोटोत बेबी बंम्प पाहायला मिळत आहे. फोटो शेअर करत तिने एक फनी कॅफ्शन लिहीली आहे. मी खरंच प्रेग्नंट आहे की, पिज्झा खाल्यामुळे इतके पोट दिसतंय.फोटोपेक्षा कॅप्शनेच सा-यांचे लक्ष  वेधले आहे. कॅप्शन वाचून चाहतेही तिला भन्नाट उत्तर देत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

सोशल मीडियावर लीसा हेडनच्या फॉलोअर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे दुस-यांदा आई होण्यापासून ते बाळाला जन्म दिल्यापर्यंत सगळ्याच अपडेट लीसाने सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. प्रेग्नंसीमध्ये 9 व्या महिन्यात बिकीनी फोटोशूट करत तिने सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. लीसा आता दोन मुलांची आई असल्यामुळे मदरहुड एन्जॉय करतेय.

लीसाच्या पहिल्या प्रेग्नंसीचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. प्रेग्नंसीकाळात तिने केलेल्या बोल्ड फोटोशूटचीही प्रचंड चर्चा झाली होती. तिस-यांदा प्रेग्नंट असलेली लीजा पुन्हा एकदा त्याच कारणामुळे सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. मध्यंतरी तिने व्हिडीओ शेअर केला होता.

 

 

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती आळसामुळे मी माझ्या प्रेग्नंसीची माहिती चाहत्यांना देऊ शकली नाही, असे ती या व्हिडीओत म्हणते आणि मग कॅमेरा तिचा मुलगा जॅककडे वळतो. यानंतर मम्मीच्या टमीमध्ये काय आहे, हे तू सांगणार का? असा प्रश्न लीजा मुलाला विचारते. यावर बेबी सिस्टर, असे जॅक म्हणतो. लीजानेने हा व्हिडीओ शेअर करताना 3 जून ही तारीख लिहिली आहे. म्हणजेच, ती 3 जूनला बाळाला जन्म देणार आहे.

टॅग्स :लीसा हेडन