अभिनेता आमिर खान (Aamir Khan) वयाच्या ६० व्या वर्षी प्रेमात पडला आहे हे सर्वांनाच आता माहित झालं आहे. ४६ वर्षीय गौरी स्प्रॅटला (Gauri Spratt) तो डेट करत आहे. आपल्या ६० व्या वाढदिवशी त्याने गौरीला सर्वांसमोर आणलं. गौरीचा फिल्मी इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही. आमिर सध्या अनेक ठिकाणी गौरीसोबत दिसत आहे. नुकताच तो विमानतळावर आला असता कारमध्ये गौरी त्याची वाट बघत होती. ती आमिरला घ्यायलाच विमानतळावर पोहोचली होती. त्यांचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.
आमिर खान आणि गौरी स्प्रॅट गेल्या २५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. तर गेल्या दोन वर्षांपासून दोघंही एकमेकांना डेट करत आहेत. गौरी स्प्रॅटचा याआधी घटस्फोट झाला असून तिला एक मुलगा आहे. तर आमिरचा दोन वेळा घटस्फोट झाला आहे. दोघंही एकमेकांच्या आयुष्यात येण्याने आनंदी आहेत. आमिर गौरीच्या अक्षरश: प्रेमात आहे. याचीच झलक विमानतळावर दिसली. आमिर मुंबईत पोहोचताच विमानताळाबाहेर कारमध्ये गौरी त्याची वाट बघत होती. आमिर कारजवळ पोहोचला आणि गौरी बाजूच्या सीटवर बसायला गेली. आमिर सीटवर बसताच दोघंही एकमेकांना पाहून खूश झाले. नंतर दोघांनी एकमेकांना किस केलं. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
सध्या आमिर खान वेगळ्याच कारणामुळे ट्रोलही होत आहे. तुर्कीच्या फर्स्ट लेडीची भेट घेतल्यामुळे त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आमिरने तुर्कीमध्ये 'लाल सिंह चड्डा' सिनेमाचं शूट केलं होतं. त्यावेळी त्याने तुर्कीच्या फर्स्ट लेडीची भेट घेतली होती. मात्र आता भारत-पाक तणावादरम्यान तु्र्की देशाने पाकिस्तानला साथ दिल्याने भारताने तुर्कीवर बहिष्कार टाकला आहे. त्यातच आमिरचा तो फोटो व्हायरल झाल्याने त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.