Join us  

'गणपत' प्रदर्शित होताच टायगर श्रॉफ पोहचला सिद्धिविनायक मंदिरात; बाप्पाचं घेतलं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 5:44 PM

'गणपत' चित्रपट प्रदर्शित होताच टायगर श्रॉफ सिद्धिविनायक मंदिरात पोहचला. त्यानं बाप्पाचं दर्शन घेतलं.  

अभिनेता टायगर श्रॉफ, अभिनेत्री क्रिती सेनन आणि बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट 'गणपत' आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामुळे टायगर गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत होता. 'गणपत' हा चित्रपट जबरदस्त असल्याचे सांगितले जातंय. चित्रपट प्रदर्शित होताच टायगर श्रॉफ सिद्धिविनायक मंदिरात पोहचला. त्यानं बाप्पाचं दर्शन घेतलं.  यावेळीचे काही फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

सुरक्षेसासाठी पोलिसही त्यांच्यासोबतत चालत होते. यावेळी पांढरा कुर्ता, कपाळावर टिळक अशा लुकमध्ये तो  दिसला. अभिनेत्याने पॅप्ससाठी पोजही दिली. प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर मुंबईतील प्रभादेवी येथे आहे. सिद्धिविनायक मंदिर 200 वर्षांहून अधिक जुने आहे.

  'गणपत' हा सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे. जिकडे तिकडे  'गणपत' चीच चर्चा होताना दिसत आहे. गणपत हा बिग बजेट सिनेमा आहे.  हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड या भाषांत प्रदर्शित झाला आहे. 'गणपत'मध्ये क्रिती पहिल्यांदाच ॲक्शन करताना पाहायला मिळत आहे. वाशू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख आणि विकास बहल यांनी गणपत या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 तब्बल 9 वर्षांनंतर टायगर-क्रितीची जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसली. याआधी 'हीरोपंती' या सिनेमात ते एकत्र झळकले होते. 'हीरोपंती' हा दोघांचाही पहिला सिनेमा होता. ‘बागी’, ‘फ्लाइंग जट्ट’, ‘मुन्ना मायकल’, ‘बागी 2’, ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’, ‘वॉर’, ‘बागी 3’, ‘हिरोपंती 2’ या चित्रपटांत टायगरने मुख्य भूमिका साकारली आहे. टायगर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

टॅग्स :टायगर श्रॉफबॉलिवूडसिनेमा