Join us  

मैत्रिणींनो खरं बोला, #Metoo मोहीम बदनाम व्हायला नको; हुमा कुरेशीचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 11:34 AM

मीटू मोहिमेंतर्गत महिलांवरील लैंगिक अत्याचाराला वाचा फोडण्यात येत आहे. तुनश्री दत्ताने नानावर आरोप केल्यानंतर,

मुंबई - अभिनेत्री तुनश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर, बॉलिवूडमध्ये #Metoo मोहीम पुन्हा एकदा जोमाने सुरू झाली. यास पाठिंबा देत अनेक सेलिब्रिटी अभिनेत्री या मोहिमेत सहभागी होत आहेत. तर, बॉलिवूडसह विविध क्षेत्रातही #Metoo मोहिमेचा दाखला देत महिलांवरील अत्याचार माध्यमांसमोर मांडण्यात येत आहेत. अभिनेत्री हुमा कुरेशीनेही या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. पण, माझ्या बहिणींनो कुणावरही विनाकारण आरोप करू नका असे आवाहनही तिने केलं आहे. 

मीटू मोहिमेंतर्गत महिलांवरील लैंगिक अत्याचाराला वाचा फोडण्यात येत आहे. तुनश्री दत्ताने नानावर आरोप केल्यानंतर, अभिनेत्री कंगना रानौत, लेखिका व निर्मात्या विनता नंदा यांसह अनेक अभिनेत्री याप्रकरणी मौन सोडले आहे. तसेच सोशल मीडियातूनही या मोहिमेला मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र, या मोहिमेतील दुसरी बाजूही तपासण्याची गरज आहे. विनाकारण, कुणावरही आरोप करुन एखाद्या पुरुषाला बदनाम करण्याचा प्रकार घडू नये, असेही अनेकांना वाटते. त्यातच, अभिनेत्री हुमा कुरेशीनेही ट्विट करुन याप्रकरणी मत व्यक्त केलं आहे. सर्वांना नमस्कार, #Metoo मी सुद्धा तुमच्यासोबत आहेच, पण माझ्या बहिणींनो विनाकारण कुणावरही चुकीचे आरोप करु नका, ज्यामुळे ही मोहीम वादग्रस्त किंवा बदनाम होईल. प्रत्येक प्रसंग किंवा मजेशीर, प्रेमाने मारलेल्या गप्पा हे शोषण नव्हे. या दोन्हीतील फरक समजूनच आपण पुढ यायला हवं. त्यामुळे, अनेक दिवसांपासून दबलेल्या आवाजाला सर्वांसमोर आणण्यास मदत होईल. पण, कृपया ते केवळ सत्यच असावं. असे ट्विट हुमा कुरेशीने केलं आहे. या मोहिमेच्या माध्यमातून विनाकारण कुणाला ट्रॅप न करण्याचेच हुमाने आपल्या ट्विटमधून सूचवले आहे.

 

टॅग्स :हुमा कुरेशीबॉलिवूडतनुश्री दत्तानाना पाटेकर