Join us

फ्रिडा होती ‘एनएच १०’ची फर्स्ट चॉईस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 18:04 IST

अनुष्का शर्माने ‘एनएच १०’ मध्ये उत्कृष्ट अभिनयाचे सादरीकरण केले. बॉक्स आॅफिसवर मागील वर्षी हिट झालेल्या चित्रपटांपैकी एक हा चित्रपट. ...

अनुष्का शर्माने ‘एनएच १०’ मध्ये उत्कृष्ट अभिनयाचे सादरीकरण केले. बॉक्स आॅफिसवर मागील वर्षी हिट झालेल्या चित्रपटांपैकी एक हा चित्रपट. अनुष्काला तिच्या चित्रपटातील परफॉर्मन्ससाठी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. फेस्टी मीराचा अभिनय तिने एवढा उत्कृष्ट केला आहे की, दुसऱ्या कुठल्या अभिनेत्रीची तिच्या जागेवर कल्पना करणे कठीण आहे. चित्रपटाच्या माध्यमातून तिचे झालेले कौतुक पाहता तुम्हाला वाटते का की, अनुष्का चित्रपटासाठी फर्स्ट चॉईस होती? खरंतर, फ्रिडा पिंटो हिला या भूमिकेसाठी दिग्दर्शकाला घ्यायचे होते. मात्र, तिने या चित्रपटाला नकार दिल्याने अनुष्काला या चित्रपटात घेण्यात आले. अनुष्का जेव्हा बोर्डवर आली तेव्हा चित्रपटातील भूमिकांमध्येही बदल झाले. चित्रपटाच्या बाबतीत एवढे बदल होऊनही अनुष्काने असा परफॉर्मन्स केला की, तिचे चाहत्यांसह समीक्षकांनीही कौतुक केले आहे. या चित्रपटाला तिने एक आव्हान म्हणून स्विकारले होते.