Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया, दीपिकालाही मुमताज यांची लेक देतेय टक्कर, तरीही आहे ग्लॅमरस इंडस्ट्रीपासून लांब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 13:21 IST

फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान सोबत तिने २००५ साली लग्न केले आहे. तर धाकटी मुलगी तान्या हिनेही लंडन येथील बॉयफ्रेंड मार्को सोबत लग्न केले आहे.

अनेक स्टार किड्स आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत रूपेरी पडद्यावर झळकतात. मात्र असेही काही स्टार किड्स आहेत ज्यांनी वेगळाच मार्ग निवडत आपापल्या आयुष्यात सेट झाले. यांत मुमताज यांची मुलगी तान्याचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. मुमताज यांनी दोन मुली आहेत. यापैकी तान्याचा सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळतो. 

खरंतर १९७४ मध्ये युगांडा येथील बिजनेसमन मयूर माधवाणी यांच्यासोबत मुमताज विवाहबंधनात अडकल्या. मोठी मुलगी नताशा हिचे लग्न झाले आहे फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान सोबत तिने २००५ साली लग्न केले आहे. तर धाकटी मुलगी तान्या हिनेही लंडन येथील बॉयफ्रेंड मार्को सोबत लग्न केले आहे. 

तान्या तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे. नुकतेच तिने आपले बिकणीतील फोटो शेअर केल्यामुळे सोशल मीडियावर  तिचे सौंदर्य पाहताच आजच्या आघाडीच्या नायिकाही तिच्या समोर फिक्या पडतील असेच आहे. तिचा हा फोटो बोल्ड अंदाजातील असला तरी तिच्या सौदर्यांच्या प्रेमात नेटीझन्स पडले आहेत. 

 तर दुसरीकडे सोशल मीडियावर तिचे फोटो पाहून नेटीझन्स अनेक प्रश्न विचारताना पाहायला मिळत आहेत.  मुमताज यांची मुलगी असूनही तान्याने चित्रपटसृष्टापासून लांबच राहणे पसंते केले आहे. तान्या बऱ्याचदा आपले फोटो पोस्ट करत असते. मी  त्यामुळे मुमताज यांची मुलगी तान्याने सध्या प्रकाशजोतात आली आहे.

टॅग्स :मुमताज