Join us

​‘मेरी प्यारी बिंदू’च्या फस्ट लूक रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 22:10 IST

अभिनेता आयुष्यमान खुराणा व अभिनेत्री परिणीती चोप्रा यांची प्रमुख भूमिका असेलेल्या ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाचे पहिला लूक रिलीज ...

अभिनेता आयुष्यमान खुराणा व अभिनेत्री परिणीती चोप्रा यांची प्रमुख भूमिका असेलेल्या ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाचे पहिला लूक रिलीज करण्यात आला आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या फोटोमध्ये दोघांची केमेस्ट्री चांगलीच जुळून आली असून आयुष्यमान व परिणीती मस्ती करताना दिसत आहेत. दिग्दर्शक अक्षय रॉय यांच्या ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटात एका गायकाची कथा दाखविण्यात आली असून ही भूमिका आयुष्यमान खुराना साकारत आहे. सोबतच या चित्रपटात नायिकेची भूमिका साकारणाºया परिणीतीलाही गाण्याची आवड आहे. गाण्यामुळे दोघेही एकमेकांकडे आकर्षित होतात. अशी या चित्रपटाची क था आहे. रोमाँटिक कॉमेडी असलेला हा चित्रपटात आयुष्यमान व परिणीती चोप्रा या दोघांनी आपल्या आवाजात गाणी गायली आहेत. परिणीतीने गायलेले गाणे सध्या चांगलेच व्हारल होत आहे. मेरी प्यारी बिंदूच्या फर्स्ट लूक फोटोमध्ये आयुष्यमान व परिणीती एका ठिकाणी बसले असून दोघेही मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत. आयुष्यमानचा क्लिनशेव्ह लूक आकर्षित करणारा आहे. तर परिणीती बोटांनी कुणाला तरी शूट करीत असल्याचे दिसते. निर्माती मीनाक्षी शर्मा हिने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट पुढील वर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येते. }}}}