Join us  

'फिल्मी सुहाग रात..!' स्वरा भास्करनं शेअर केला हनीमूनच्या रात्रीचा 'तो' फोटो, होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 6:46 PM

Swara Bhaskar : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. नुकतेच तिने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमद यांच्यासोबत लग्न केले.

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. नुकतेच तिने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमद यांच्यासोबत लग्न केले. याआधीच स्वराने कोर्टात जाऊन फहाद यांच्याशी लग्न केल्याचेही स्पष्ट केले. त्यानंतर हा फक्त साखरपुडा आहे, अजून रीतसर रितीरिवाजानुसार लग्न होणार असल्याचेही तिने सांगितले. मात्र स्वराने गुपचुप जाहीर केलेल्या या लग्नाच्या वृत्ताची जोरदार चर्चा झाली. काहींनी तिला शुभेच्छा दिल्या तर काहींनी तिला चांगलेच ट्रोल केले.

दरम्यान आता स्वरा भास्करने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून आणखी एक फोटो शेअर करत लोकांना सरप्राइज दिले होते. लग्नानंतर मधुचंद्राच्या रात्रीच्या दिवशी बेडरूममधील सजावटीचा एक फोटो शेअर केला होता. आता तिच्या अकाऊंटवरुन हा फोटो डिलीट करण्यात आला आहे. मात्र तरी हा फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या फोटोत स्वराने तिच्या बेडरूममध्ये फुलांनी सजवलेला बेड आपल्याला दिसत आहे, यासोबतच तिने तिच्या आईसाठी या फोटोमध्ये खास मेसेज दिला आहे. या फोटोसोबत स्वराने लिहिले की, माझी मधुचंद्राची रात्र एकदम फिल्मी असावी यासाठी आईने पूर्ण तयारी केली आहे. स्वराच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्री तिची बेडरूम सजवण्याची जबाबदारी होम डेकोर स्टाइलिस्ट प्रियंका यादवकडे देण्यात आली होती. प्रियंकानेसुद्धा स्वराने शेअर केलेला हा फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला होता. 

स्वरा भास्करने फहाद अहमद यांच्यासोबत ६ जानेवारीलाच कोर्टात जाऊन लग्न केले. नंतर १६ फेब्रुवारीला त्यांच्या लग्नाबद्दल जाहीर केले आणि त्यादरम्यानचे फोटोज शेअर करत चाहत्यांना सरप्राइज दिले. फहाद अहमद हे समाजवादी पार्टीची युवा संघटनेचा मुंबई आणि महाराष्ट्र भागातील अध्यक्ष आहेत. सीएए विरोधात काढलेल्या मोर्चादरम्यानच स्वरा आणि फहाद यांची ओळख झाली होती आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :स्वरा भास्कर