Join us

Fighter : हृतिक रोशन-दीपिकाचे फायटरमधील रोमँटिक सीन्स व्हायरल, अभिनेत्रीच्या बोल्डनेसची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2023 15:51 IST

'फायटर'मधील हृतिक आणि दीपिकाचे काही सीन्सची प्रचंड चर्चा रंगली आहे. 

बॉलिवूडमधील 'टायगर ३', 'सॅम बहादूर', 'ॲनिमल' या सिनेमांनंतर आता प्रेक्षक हृतिक रोशनच्या 'फायटर' सिनेमाच्या प्रतिक्षेत आहे. या सिनेमात हृतिकबरोबर अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर मुख्य भूमिकेत आहेत. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. 'फायटर'चा टीझर पाहिल्यानंतर आता या सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या टीझरमधील हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. सोशल मीडियावर 'फायटर'मधील हृतिक आणि दीपिकाचे काही सीन्सची प्रचंड चर्चा रंगली आहे. 

'फायटर' सिनेमातून हृतिक आणि दीपिका ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच हृतिक आणि दीपिकाने एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच हृतिक-दीपिका या जोडीला मोठ्या पडद्यावर प्रेक्षक पाहणार आहेत. 'फायटर'च्या टीझरमध्येच हृतिक-दीपिकाची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या टीझरमधील त्यांचे काही सीन्सही व्हायरल झाले आहेत. 'फायटर' टीझरमध्ये हृतिक-दीपिकाचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला. त्यांच्या या रोमँटिक सीन्सने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. 

दीपिका-हृतिकची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं चित्र आहे. 'फायटर'मध्ये हृतिक व दीपिका स्क्वॉड्रन लीडरची भूमिका साकारताना दिसणार आहेत. दीपिकाचा स्क्वॉड्रन लीडरबरोबरच टीझरमधील हॉट अंदाजही प्रेक्षकांना भावला आहे. या टीझरमधील दीपिका-हृतिकच्या एका सीनची तुलना पठाणमधील शाहरुख खान-दीपिकाच्या सीनशी नेटकरी करत आहेत. 

दरम्यान, 'फायटर' सिनेमाचं दिग्दर्शन पठाण आणि वॉरचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. हा सिनेमा नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी 'फायटर' सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. 

टॅग्स :हृतिक रोशनदीपिका पादुकोणसिनेमासेलिब्रिटी