Join us

मिल्खा सिंग यांना बॉलिवूडकरांनी वाहिली श्रद्धांजली, फरहान म्हणाला, तुमचे आयुष्य सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल ​

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 09:56 IST

मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर भाग मिल्खा भाग हा चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटात मिल्खा सिंग यांच्या भूमिकेत अभिनेता फरहान अख्तर दिसला होता.

ठळक मुद्देफरहान लिहितो, तम्ही कायम आमच्यासोबत असणार आहात... तुम्ही खूप चांगले व्यक्ती होता.

भारताचे माजी दिग्गज धावपटू मिल्खा सिंग (Milkha Singh) यांचे कोरोनामुळे शुक्रवारी रात्री निधन झाले. एक महिन्यापासून त्यांचा कोरोनाविरुद्ध लढा सुरू होता. मिल्खा सिंग यांच्या पत्नी व भारताच्या व्हॉलिबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौर यांनी कोरोना संक्रमणामुळे पाच दिवसांपूर्वी अखेरचा श्वास घेतला होता. 

मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर भाग मिल्खा भाग हा चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटात मिल्खा सिंग यांच्या भूमिकेत अभिनेता फरहान अख्तर दिसला होता. त्याने सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने मिल्खा सिंग यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत त्यासोबत लिहिले आहे की, तुम्ही आज आमच्यात नाहीत यावर मला विश्वासच बसत नाहीये. तुमच्याकडून मी एक गोष्ट शिकलो आहे की, कोणतीही परिस्थिती आली तरी हार पत्करायची नाही.

 पुढे फरहान लिहितो, तम्ही कायम आमच्यासोबत असणार आहात... तुम्ही खूप चांगले व्यक्ती होता. तुम्ही एक स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण देखील केले. आयुष्यात ध्येय असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्ही सगळ्या गोष्टी मिळवू शकता हे तुम्ही आम्हाला शिकवले. तुम्ही एक खूप चांगले मित्र, वडील होता. तुमचे आयुष्य सगळ्यांसाठी प्रेरणादायी असेल... मी तुमच्यावर खूप प्रेम करतो...

रितेश सिडवानीने देखील मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने लिहिले आहे की, मिल्खा सिंग यांच्या निधनाविषयी कळल्यावर खूपच वाईट वाटले. आज आपण आपला एक चॅम्पियन गमावला...

प्रियंका चोप्रा, शाहरुख खान, अक्षय कुमार, अनुपम खेर, सुनील शेट्टी यांनी देखील मिल्खा सिंग यांना सोशल मीडियाद्वारे  श्रद्धांजली वाहिली आहे.

टॅग्स :मिल्खा सिंगफरहान अख्तर